'या' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप | Marathi Serials | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi serials

'या' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यापैकी एक मालिका ही झी मराठी वाहिनीवरील आहे तर दुसरी स्टार प्रवाह वाहिनीवरील आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकांचे शेवटचे भाग चित्रित करण्यात आले आहेत. झी मराठी वाहिनीवरील 'ती परत आलीये' Ti Parat Aaliye ही मालिका आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'जय भवानी जय शिवाजी' Jai Bhavani Jai Shivaji ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या दोन्ही मालिकांची जागा आता नवीन मालिका घेणार आहेत.

'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका अवघ्या १५० भागांतच ही मालिका संपतेय. मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस कसा होता हे सांगताना अभिनेता भूषण प्रधानने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली होती. या मालिकेत भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मालिका लवकर बंद होण्याबाबत नाराजी व्यक्त केली. आता सचित पाटीलची मुख्य भूमिका असलेली 'अबोली' ही मालिका या मालिकेची जागा घेणार आहे.

हेही वाचा: निलेश साबळेंनी नारायण राणेंची मागितली माफी; 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा वाद

दुसरीकडे 'ती परत आलीये' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका लवकरच बंद होणार आहे. ही मालिका फक्त १०० भागांची असेल असं सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसारच या मालिकेचा शेवट होत आहे. त्याठिकाणी 'देवमाणूस २' ही लोकप्रिय मालिका नव्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top