आईनं घेतली टायगरची बाजू, दिशानं ट्रोलर्सला झापलं

तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
Tiger and Disha
Tiger and Disha Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानी (Disha patani) हे सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आले आहेत. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. याशिवाय आपल्या अधिकृत व्टिटर हँडलवरुन त्यांनी लिहिले होते की, कुणीही जास्त हिरोपंती (Heropanti) करण्याची गरज नाहीये. सर्वांनी सध्याच्या काळात आरोग्यविषयक सुचनांचे पालन करावे. आता या प्रकरणात टायगरच्या आईनं त्याची बाजू घेत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ( Tiger Shroff mom Ayesha defends him Disha Patani after police case)

यावर काही युझर्सनं पोस्ट शेअर (post share on social media) करुन टायगर आणि दिशाला (tiger and disha) ट्रोल केले होते. त्यावर दिशानं त्यांना चांगलेच सुनावले आहे. तिनं म्हटलं आहे की, तुमच्याकडे जी माहिती आहे ती खोटी आहे. त्यातील फॅक्ट्स तुम्हाला माहिती नाहीये. त्यामुळे उगाचच काहीही पोस्ट करुन बदनामी करण्याचे थांबवा. असं दिशानं म्हटलं आहे. टायगर हा काही उगाचच बाहेर पडला नव्हता. तो महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला. तो फिरण्यासाठी गेला नव्हता. हे मला सांगावं लागेल.

tiger and disha post
tiger and disha post Team esakal

दिशानं ट्रोलर्सला दिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तुमच्याकडे असलेली माहिती चूकीची आहे. जेव्हा ते घरी येत होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्याकड़े आधार कार्डची मागणी केली. त्यावेळी कुणी फिरण्याच्या उद्देशानं बाहेर पडले नव्हते. त्यामुळे आम्हाला कोणी बोलत असेल तर प्लिज अगोदर फॅक्ट्स चेक करुन घ्या. असंही दिशानं म्हटलं आहे. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Tiger and Disha
'एवढं शिकून उपयोग काय?' हिजाबवरून ट्रोल करणाऱ्याला सनाचं सडेतोड उत्तर
Tiger and Disha
माझ्या बायोपिकमध्ये दीपिकानेच काम करावे- पी. व्ही. सिंधू

बुधवारी टायगर आणि दिशाला मुंबई पोलिसांनी अडवले होते. त्यावेळी त्यांच्याकडे त्यांनी लायसन्स आणि आधारकार्डाची मागणी केली होती. पोलिसांना ते विनाकारण घराबाहेर पडल्याचे दिसून आल्यानं त्यांनी त्यांच्यावर कोविड नियमांच्या अंतर्गत कारवाईही केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com