esakal | 'आज मला शांत झोप लागेल, प्रियाची पोस्ट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Priya bapat

'आज मला शांत झोप लागेल, प्रियाची पोस्ट व्हायरल'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा संसर्ग सातत्यानं वाढतो आहे. त्याला सामोरं जाण्यासाठी सर्व पातळीवरुन प्रयत्न सुरु आहेत. राज्यानं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. काही करुन कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणायची असा निर्धार कोरोना योध्द्यांनी केला आहे. त्याला आता सेलिब्रेटींनी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. केवळ बॉलीवूडचे कलाकारांनी यात पुढाकार घेतलेला नाही तर मराठीच्या अनेक सेलिब्रेटींनी कोरोनासाठी लढायचे ठरवले आहे.

सध्या प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्रिया बापटची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यामुळे ती चर्चेतही आली आहे. प्रियानं इंस्टावर तिच्या त्या पोस्टमध्ये आपल्याला फायनली रक्तदान करता आले याचा आनंद होत असल्याचे सांगितले आहे. ती म्हणते, मी आता पोस्ट कोविडनंतर रक्तदान करायला पात्र आहे. आणि मला ही संधी सोडायची नाहीये. आपण समाजाचे काही देणे लागतो. त्यामुळे एक सामाजिक भूमिका म्हणून मला रक्तदान करायला हवे. असे तिनं लिहिलं आहे.

प्रिया आपल्या पोस्टमध्ये म्हणते, हे माझं पहिलं रक्तदान आहे. मला खरं तर सुईची फार भीती वाटते. इंजेक्शन घेतानाही यापूर्वी घाबरुन गेली आहे. माझा रक्तगटही ए निगेटिव्ह आहे. त्यामुळे एखाद्या दुर्मिळ रक्तगट असणा-या व्यक्तिला ते महत्वाचे आहे. त्यामुळे अशावेळी मी माझे रक्तदान महत्वाचे समजते. माझे डॉक्टर म्हणाले होते. एखाद्या व्यक्तिला गरज असते त्यावेळी तुम्ही त्याला रक्तदान करणे महत्वाचे आहे. आणि तु ते करायला हवं. असेही त्यांनी मला सांगितले होते.

हेही वाचा: माझ्या राहुलच्या मृत्युला जबाबदार कोण, पत्नीचा सवाल?

हेही वाचा: कोरोनाच्या संकटात धावला 'बाहुबली' ; चित्रपटाचा सेट रुग्णालयाला

मी जर आता रक्तदानाच्या भीतीवर मात केली नसती तर मला पुन्हा हे कधीच जमले नसते. म्हणून ज्यावेळी बरी होईल तेव्हा पहिल्यांदा रक्तदान करणार असा निर्धारही मी केला होता. असेही प्रियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.