'पुष्पा' फेम अल्लु अर्जुनचं लेकीनं केलं हटके स्वागत

पुष्पा द राईज या चित्रपटाचा पहिला भाग (Tollywood movies) प्रदर्शित झाला.
Allu Arjun
Allu Arjun

Pushpa The Rise: पुष्पा द राईज या चित्रपटाचा पहिला भाग (Tollywood movies) प्रदर्शित झाला. आणि प्रेक्षकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत कोट्यवधी रसिकांकडून पुष्पाला दाद मिळाली होती. रश्मिका मंदाना, (Rashmika Mandana) समंथा अक्किनेनी (Samantha Akkenine) यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. महिनाभरापासून पुष्पाची क्रेझ सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर पुष्पानं कमाल केली आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई देखील या चित्रपटानं केली आहे. आता पुष्पा फेम अल्लु अर्जुन हा त्याच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. टॉलीवूडच्या या स्टारचं त्याच्या घरी जे स्वागत झालं आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पुष्पा हिट (pushpa Movie) झाल्यानंतर अल्लु अर्जुन हा नॅशनल सेलिब्रेटी झाला आहे. सोशल मीडियावर पुष्पा हा ट्रेडिंगचा विषय आहे. बॉलीवूड सेलिब्रेटींना देखील पुष्पावरुन रील करण्याचा मोह आवरलेला नाही. या चित्रपटातील श्रीवल्ली आणि उ अंटावा गाण्याला तर कोट्यवधी रसिकांची पसंती मिळाली आहे. अल्लुला तर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. मात्र त्याच्या मुलीकडून त्याचं घरी जे स्वागत झालं आहे तो व्हिडिओ आता सोशल मीडीयावरुन व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांची मनपूर्वक दाद मिळाली आहे. अल्लुचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत.

Allu Arjun
Victoria Marathi Movie : विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'व्हिक्टोरिया' सिनेमा ; पाहा व्हिडीओ

अल्लु अरहा असे अल्लुच्या मुलीचं नाव आहे. त्याच्या पत्नीचं नाव स्नेहा रेड्डी असं आहे. अल्लुनं अर्जुननं त्याच्या इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिनं त्याचं नाव वेलकम नाना असं लिहिलं आहे. तो फोटो शेयर करताना अल्लुनं लिहिलं आहे की, परदेशात 16 दिवस राहिल्यानंतर मला माझ्या लाडकीनं वेलकम केलं आहे. त्यानं मी भारावून गेलो आहे. अरहानं स्वता ते लिहिलं आहे. ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. अल्लुची मुलगी आरहा ही सध्या सोशल मीडियावरची प्रसिद्ध बालकलाकार आहे.

Allu Arjun
Zombiewali Movie l मराठीतला पहिलाच 'झोम्बीपट' प्रेक्षकांना भावणार? |पाहा व्हिडीओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com