लग्न मंडपातच 'भल्लाचा लिप लॉक'....व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न मंडपातच 'भल्लाचा लिप लॉक'....व्हिडिओ व्हायरल
लग्न मंडपातच 'भल्लाचा लिप लॉक'....व्हिडिओ व्हायरल

लग्न मंडपातच 'भल्लाचा लिप लॉक'....व्हिडिओ व्हायरल

मुंबई - भारतीय चित्रपटांच्या इतिहासामध्ये एका चित्रपटाचं नाव हे कायम घेतलं जाईल. तो म्हणजे एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली. या चित्रपटानं प्रचंड कमाई तर केलीच याशिवाय परदेशातही मोठी लोकप्रियता मिळवली. या चित्रपटामध्ये सुपरस्टार राणा दग्गुबाती आणि प्रभास यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयानं चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेलं. सध्या राणा दग्गुबाती हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याचा विवाहसोहळा. मात्र त्या सोहळ्यात त्यानं सर्वांचे लक्षही वेधून घेतले आहे. राणा दग्गुबाती आणि त्याच्या पत्नीचा तो व्हिडिओ तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

त्या व्हिडिओमध्ये भर लग्नमंडपामध्ये ते एकमेकांना किस करताना दिसून आले आहेत. त्या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहे. अनेकांनी या नवदाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. वधूच्या भूमिकेत राणाची पत्नी मिहिका कमालीची सुंदर दिसते आहे. बाहुबलीमध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणाच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

राणानं तो व्हिडिओ शेयर करताना लिहिलं आहे की, परफेक्ट मॅच...मिहिकाच्याबाबत सांगायचे झाल्यास ती एक इव्हेंट प्लॅनर आहे. तसेच ती मुंबईतील ड्यु ड्रॉप डिझाईन स्टूडिओची प्रमुखही आहे. तर राणा दग्गुबाती हा सध्याच्या घडीला टॉलीवूडमधील स्टार अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सैनिकांच्या आयुष्यावर आधारित एका मालिकेमध्ये त्यानं प्रमुख भूमिका साकारली होती. 2011 मध्ये राणानं दम मारो दम मध्ये भूमिका केली होती. याशिवाय त्यानं हाऊसफुल्ल 4, द गाजी अॅटकमध्येही भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

loading image
go to top