लॉकडाऊनच्या काळात पतीनं....; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात पतीनं....; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एका अभिनेत्रीनं तिच्या पतीविरोधातच बलात्काराची तक्रार केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या अभिनेत्रीनं दरम्यानच्या काळात दिलेल्या आपल्या स्टेटमेंटमधील खुलासे धक्कादायक आहे. त्यामध्ये पती लॉकडाऊनमध्ये जबरदस्तीनं आपल्यासोबत शाररिक संबंध ठेवत असल्याचा आरोप त्या अभिनेत्रीनं केला आहे. सध्या त्या अभिनेत्री आणि अभिनेत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनपासून त्या पतीनं आपल्या अभिनेत्रीला पत्नीला जबरदस्तीनं शाररिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

अभिनेत्रीनं पतीवर बलात्कार आणि हुंड्याची देखील तक्रार केली आहे. पतीनं आपल्या वेळोवेळी शाररिक आणि मानसिक त्रास दिल्याचे सांगितलं आहे. अभिनेत्री टॉलीवूडची अभिनेत्री असल्याचे सांगितलं जात आहे. अभिनेत्रीनं जबाबात सांगितल्याप्रमाणं, आमचं लग्न होण्यापूर्वी तो घरी येत असे आणि तेव्हा लॉकडाऊनच्या वेळी शाररिक संबंध प्रस्थापित केले. ते करण्यासाठी त्याचा अट्टाहास असे. त्यानंतर त्यानं अनेकदा लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचेही सांगितले. यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना घडली होती.

लग्न झाल्यानंतर त्या अभिनेत्रीचा सासरच्यांनी मानसिक त्रास सुरु केला. त्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचेही सांगण्यात आले आहे. ती अभिनेत्री आता पतीपासून वेगळी झाली आहे. कर्नाटक पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल केला आहे. कर्नाटकातील बसवनागुडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्यानं आपल्याला बाहेर भेटता येणार नाही. म्हणून त्या व्यक्तीनं घरी येऊन आपल्यावर बलात्कार केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कर्नाटक पोलीस करत आहे.

लॉकडाऊनच्या काळात पतीनं....; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'
लॉकडाऊनच्या काळात पतीनं....; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
'टप्पु'बरोबरचं अफेयर; बबिताची गुड न्यूज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com