esakal | समंथानं पुन्हा नाव बदललं, याचा अर्थ...
sakal

बोलून बातमी शोधा

समंथानं पुन्हा नाव बदललं, याचा अर्थ...

समंथानं पुन्हा नाव बदललं, याचा अर्थ...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा( samantha) ही तिच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे. तिचा केवळ टॉलीवूडमध्ये चाहतावर्ग नाही तर बॉलीवूडमध्येही तिनं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा आणि नागा चैतन्य यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्यांच्यात वाद असल्याचे बोलले जात होते. फॅन्सलाही त्यांचं वेगळं होणं खटकणारं होतं. यासगळ्यात समंथानं यापूर्वी सोशल मीडियावर जेव्हा नाव बदललं तेव्हापासून चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकायला लागली होती. आता समंथानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपलं नाव बदललं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समंथा आणि नागा चैतन्याचं (naga chaitanya) लग्न मो़डणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. एवढचं नाहीतर तिनं काही कोटी रुपयांचा दावाही दाखल केला आहे. अशाप्रकारच्या अफवांनी सोशल मीडियावर चर्चाही सुरु झाली आहे. यावेळी समंथानं पुन्हा एकदा सोशल मीडीयावर बदलेलं नाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चार वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या समंथा आणि नागा चैतन्य यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. समंथा बॉलीवूडमध्ये द फॅमिली मॅन 2 सीरिजपासून प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या त्या भूमिकेचे कौतूकही झालं. तिनं त्या मालिकेत काम करु नये आणि फॅमिलीकडे लक्ष द्यावं. असं तिच्या पतीचं म्हणणं होतं.

समंथानं आता सोशल मीडियावर आपलं नाव बदललं आहे. समंथानं आपल्या अक्षरापुढे समंथा असं लिहिलं आहे. समंथा यापूर्वी आपल्या नावापुढे समंथा अक्कीनेनी असं लिहित होती. आता तिनं आडनाव काढलं आहे. तिच्या या निर्णयामुळे ती चर्चेत आली आहे. एवढचं नाही तर तिनं कुठल्याही सोशल मीडियावर आपलं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. नागा चैतन्यसोबत घटस्फोटाची घोषणा करताना तिनं लिहिलं होतं की, आमच्या नात्याचा विचार करणाऱ्या सर्व माझ्या हितचिंतकांना सांगू इच्छिते की, आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून असणारी माझी मैत्री आणि प्रेम आता यापासून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा-नाग चैतन्यने जाहीर केला घटस्फोट

हेही वाचा: समंथा-नागा चैतन्याचं 'फॅमिली प्लॅनिंग'?

loading image
go to top