'अल्लु' इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा साऊथचा पहिला सुपरस्टार | Tollywood Allu Arjun First superstar highest followers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun
'अल्लु' इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा साऊथचा पहिला सुपरस्टार

'अल्लु' इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा साऊथचा पहिला सुपरस्टार

टॉलीवूडचा अल्लु अर्जुन (Tollywood Actor Allu Arjun) हा सध्या फॉर्मात आहे. त्याचं कारण पुष्पा चित्रपटानं (Pushpa Movies) त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे. बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई (Box Office) करणारा चालु वर्षीचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Arjun and Rashmika Mandana) यांच्या लोकप्रियतेत देखील वाढ झाली आहे. अर्जुनच्या बाबत सांगायचे झाल्यास तो इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा साऊथचा पहिला सुपरस्टार ठरला आहे. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसं पाहिलं तर पुष्पा अनेक अर्थानं नशिबवान ठरला. लॉकडाऊनचे निर्बंध लागण्यापूर्वी तो प्रदर्शित झाला होता. आता सध्या निर्बंध जाहिर करण्यात आल्यानं प्रेक्षकांची निराशा झाली आहे.

हेही वाचा: Pushpa Box Office : 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

अल्लुनं इंस्टावर 15 मिलिअन (Instagram Followers) फॉलोअर्सची संख्या पार केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला साऊथचा सुपरस्टार ठरला आहे. यासगळ्या निमित्तानं त्यानं आपल्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद देखील दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अल्लु अर्जुनच्या पुष्पाची चर्चा सुरु होती. त्या चित्रपटानं बॉलीवूडच्या चित्रपटांना देखील जोरदार फाईट दिली. त्यामध्ये पुष्पाच्या वाट्याला मोठं यश आलं. अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. आता हा चित्रपट ओटीटी माध्यमांवरही प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा: 'Pushpa': रश्मिका ठरली सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

हिंदीमध्ये देखील ओटीटीवर पुष्पा प्रदर्शित झाला आहे. पाच भाषांमध्ये तयार झालेल्या पुष्पानं केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर कमाई केल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांना अल्लु अर्जुनचा परफॉर्मन्स कमालीचा आवडला आहे. ते त्याच्या अभिनयाचे फॅन्स झाले आहेत. अल्लु अर्जुन हा बॉलीवूडमध्ये लोकप्रिय तर होताच मात्र पुष्पामुळे आणखी तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. आता तो साऊथचा पहिला सुपरस्टार बनला आहे ज्यानं इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्सची संख्या गाठली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top