Superstar Krishna: स्वर्गीय अभिनेते कृष्णा घट्टामनेनी यांच्या सन्मानार्थ तेलुगु फिल्म इंडस्ट्री आज बंद... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superstar Krishna
Mahesh babu

Superstar Krishna: स्वर्गीय अभिनेते कृष्णा घट्टामनेनी यांच्या सन्मानार्थ तेलुगु फिल्म इंडस्ट्री आज बंद...

प्रसिद्ध तेलुगु अभिनेते तसेच साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचे वडील कृष्णा घट्टामनेनी याचं वयाच्या 79 व्या वर्षी निधन झालं. हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्यानं टॉलीवूडनं एका मोठ्या कलाकाराला गमावलं.

या संदर्भात द तेलुगू फिल्म प्रॉडयुसर कौन्सिल ने जाहीर केले आहे की बुधवारी चित्रपटाशी संबंधित सर्व कार्यक्रम रद्द केले जातील. निवेदन शेअर करताना, पीआरओ वामसी शेखर यांनी ट्विट केले, “सुपरस्टार #कृष्णागरु (sic) यांच्या सन्मानार्थ तेलुगु चित्रपट उद्योग उद्या (बुधवार) बंद राहील.”

दिवंगत कृष्णा याच्यावर आज अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. हैदराबादमधील नानकरामगुडा येथे कृष्णाच्या पार्थिवाचे कुटुंबातील अनेक सदस्य आणि सेलिब्रिटींनी अंतिम दर्शन केले. सुपरस्टार कृष्णा यांच्या निधनावर केवळ तेलगू चित्रपटसृष्टीनेच नव्हे तर राजकारण्यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्याचं अखेरच दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जवळपास संपूर्ण टॉलिवूडचे कलाकार जमले होते.

चिरंजीवी, विजय देवरकोंडा, मोहन बाबू, अल्लू अर्जुन, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर अंतिम दर्शनाला हजेरी लावली. त्यांच्या निधन म्हणजे एका युगाचा अंत मानला जात आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज 16 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाप्रस्थानम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Mahesh Babu ला पितृशोक, दोन महिन्यापूर्वीच आईनंही घेतला होता अखरेचा श्वास...

एक उत्कृष्ट अभिनेत्यासह  कृष्णा एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. कृष्णाने 1965 च्या ‘थेने मनसुलु’ चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले आणि साक्षी, पंडंती कपूरम, गुडचारी 116, ‘जेम्स बाँड 777’, ‘एजंट गोपी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा शेवटचा ऑन-स्क्रीन तेलगू चित्रपट 2016 मध्ये आलेला ‘श्रीश्री’ हा होता. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.