esakal | पाकिस्तानामध्येही 'ट्रॅजिडी किंगला' वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

dilip kumar

पाकिस्तानामध्येही 'ट्रॅजिडी किंगला' वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय सिनेमासृष्टीतील प्रतिभावंत अभिनेते दिलीप कुमार (dilip kumar) यांचे काल वार्धक्यानं निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असणाऱ्या दिलीप कुमार यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे. केवळ भारतातच नाही तर शेजारील देश पाकिस्तानातही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पाकिस्तानातील (pakistan) पेशावर (peshawar) येथे जन्म झालेल्या दिलीप कुमार यांचा त्याठिकाणी चाहतावर्ग मोठा आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (tribute paid to dilip kumar in pakistan photos video viral on social media)

अभिनयाच्या या सम्राटावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून दिलीप कुमार यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात (hinduja hospital) उपचार सुरु होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांना पाकिस्तानमध्येही त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे एक घर पाकिस्तानातील पेशावर येथे आहे. त्या भागातील लोकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी यावेळी दिलीप कुमार यांच्या मदतीचा प्रसंग सांगितला होता. त्याला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. 11 डिसेंबर 1922 मध्ये पाकिस्तानातील पेशावर शहरात दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. ते पाकिस्तानातून मुंबईत व्यापारासाठी आले. आणि तिथेच स्थायिक झाले.

हेही वाचा: भयपटांचा बादशाह हरपला; कुमार रामसे यांचं निधन

हेही वाचा: नसीरुद्दीन शाह यांना डिस्चार्ज; मुलाने पोस्ट केले फोटो

कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या पेशावर मधील घराच्या बाहेर नमाज पढत तेथील चाहत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दिलीप कुमार यांच्या परिवारातील जवळचे सदस्य फैसल फारुखी यांनी काल सगळ्यात अगोदर दिलीप कुमार यांच्या जाण्याची बातमी सोशल मीडियावरुन दिली होती.

loading image