Tridha Chaudhury Video : स्विमिंग टँकमध्ये बबिताची डुबकी, बाबाजींना तिच्या नावाची उचकी!

ओटीटी विश्वात आपल्या बोल्डनेसनं कहर करणाऱ्या आश्रम फेम त्रिधा चौधरीनं आता तिच्या आणखी एका व्हिडिओनं लक्ष वेधून घेतो आहे.
Tridha Chaudhury Video
Tridha Chaudhury Video esakal

Tridha Chaudhury Video : ओटीटी विश्वात आपल्या बोल्डनेसनं कहर करणाऱ्या आश्रम फेम त्रिधा चौधरीनं आता तिच्या आणखी एका व्हिडिओनं लक्ष वेधून घेतो आहे. त्यामध्ये ती स्विमिंग टँकमध्ये बिकीनी लूकमध्ये दिसते आहे. त्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. यापूर्वी देखील त्रिधानं बोल्ड फोटो, व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांना जिंकून घेतले होते. आता तिचा पुन्हा एक हॉट व्हिडिओ समोर आला आहे. तिचा तो दिलखेचक अंदाज चाहत्यांना कमालीचा भावला आहे. ओटीटी विश्वात तर त्या वेबसीरिजनंतर बबिता लोकप्रिय झाली.

Also Read - नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

बॉबी देओलसोबत रोमान्स करणारी त्रिधा मोठ्या चित्रपटाच्या शोधात आहे. ओटीटीवर तिनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्ही, फिल्म इंडस्ट्रीतील झगमगत्या दुनियेत त्रिधावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्रिधानं आश्रममध्ये केलेल्या भूमिकेचं कौतूक केलं. त्रिधानं एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, येत्या काळात बॉलीवूडमधून एखाद्या चित्रपटाची अपेक्षा आहे. काही वर्षांपासून ओटीटीनं प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे.

Tridha Chaudhury Video
Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

ओटीटीचा मोठा परिणाम हा चित्रपटगृहांवर झाला आहे. लोकांना चांगल्या आशयाचे चित्रपट हवे आहेत. त्यामुळे कथाकार आणि दिग्दर्शक यांच्यासमोर देखील तगडे आवाहन आहे. बबिताच्या नव्या लुकनं आता सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्या फोटोंवरुन नेटकऱ्यांनी बाबाजी फेम बॉबी देओलवर मिश्किल टिप्पणी केली आहे.

Tridha Chaudhury Video
Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

बाबाजी बबिताचा लूक कसा वाटला, बबिताला स्विमिंग टँकमध्ये पाहून बाबाजी खूश होतील. अशा प्रतिक्रया नेटकऱ्यांनी तिच्या त्या फोटोंवर दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बबिता तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com