esakal | 'शाहरुख विमल खातो हे ठीक होतं, पण मुलगा त्याच्याही पुढे गेला'
sakal

बोलून बातमी शोधा

'शाहरुख विमल खातो हे ठीक होतं, पण मुलगा त्याच्याही पुढे गेला'

'शाहरुख विमल खातो हे ठीक होतं, पण मुलगा त्याच्याही पुढे गेला'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये सध्या जे काही घडतं आहे त्यावरुन चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, आपण बाजू कोणाची घ्यायची, त्याचे कारण म्हणजे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. त्यावरुन बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनेकांनी सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहे. किंग खानचा मुलगा जेव्हा एखाद्या प्रकरणात सापडतो असे म्हटल्यावर ट्रोलर्सनंही हात धुवून घेतले आहे. त्याला वाट्टेल त्या शब्दांत सुनावले आहे. काही चाहत्यांनी नेहमीप्रमाणे शाहरुखला सपोर्टही केला आहे. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझमध्ये जी रेव्ह पार्टी सुरु होती, त्यात अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आले होते. त्यात जवळपास हजार जणांचा सहभाग होता. त्यापैकी 13 जणांना ताब्यात घेतले होते. अनेकांची तपासणी सुरु आहे.

सोशल मीडियावर शाहरुखच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. चाहते शाहरुखच्या मागे उभे राहिले आहेत. सध्या व्टिटरवर We Stand With SRK नावाचा ट्रेंड सुरु आहे. मात्र काही युझर्स असे आहेत की, त्यांनी किंग खानला ट्रोल केले आहे. कालच्या कारवाईमध्ये एनसीबीनं आर्यन खान, अरबाज, मुनमुन धमीचा यांना अटक केली होती. त्यांना एक दिवसाची एनसीबी कस्टडी देखील मिळाली होती. यावर आज दुपारी सुनावणीही होणार आहे. आता जी माहिती समोर आली आहे त्यावरुन आतापर्यत त्या पार्टीमधून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एम डी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या सापडल्या आहेत. ज्याची किंमत एक लाख 33 हजार एवढी आहे.

काल सुनील शेट्टीनं देखील शाहरुखच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यानं लिहिलं होतं की, एनसीबीनं खरा रिपोर्ट समोर आणावा. बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं देखील काल शाहरुखची भेट घेतली आहे. त्या भेटीवरुनही शाहरुख आणि सलमानला ट्रोल करण्यात आले होते. याशिवाय पूजा भट्टनं देखील शाहरुखच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. शाहरुखच्या एका फॅन्सनं लिहिलं आहे की, चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच होतं. लोकं त्याच्या विरोधात कितीही व्देष पसरवत असली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. शाहरुख आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, चांगल्या वेळी देखील तुझ्या पाठीशी आहोत आणि वाईट काळात देखील तुझ्यासोबतच आहोत. याचे कारण मी तुझा फॅन आहे.

काहींनी शाहरुखला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, जो आपल्या मुलाला चांगलं वळण लावू शकला नाही तो दुसऱ्यांना काय सांगणार, आम्ही एका ड्रग्ज अॅडिक्ट असणाऱ्या व्यक्तीचं समर्थन कसं काय करणार, तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, शाहरुखनं विमल खाणं वेगळी गोष्ट मात्र मुलगा त्याच्याही पुढे गेला. अशा शब्दांत त्याच्यावर टीका करण्यात आली आहे. येत्या काळात एनसीबी याप्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: 'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं...

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

loading image
go to top