TRP Rating: अनुपमापुढे कुणाचे काही चालेना! सर्वोत्तम पाचमध्ये टॉपलाच |TRP Tv Entertainment Daily Soap Anupamaa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Tv Serial

TRP Rating: अनुपमापुढे कुणाचे काही चालेना! सर्वोत्तम पाचमध्ये टॉपलाच

TV Entertainment News- टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. एरवी सकाळ पासून एकापाठोपाठ सुरु असणाऱ्या (Bollywood News) कौटूंबिक मालिकांचा वरचष्मा सुरु असल्याचे दिसून आले आहे. हिंदी मनोरंजन विश्वामध्ये तर डेली सोपमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून (Bollywood Actress) घेण्यासाठी निर्माते वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या लढवताना दिसतात. त्यातून एखादी मालिका प्रेक्षकांना आवडते आणि त्याची लोकप्रियता वाढते. या (entertainment news) आठवड्यामध्ये कुठल्या मालिकेनं बाजी मारली आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांची सगळ्यात आवडती मालिका अनुपमानं पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान टिंकवून ठेवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनुपमानं प्रेक्षकांची जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे.

बार्कनं गेल्या आठवड्यातील टीआरपी लिस्ट जाहिर केली आहे. त्यामध्ये पुन्हा अनुपमाचा वरचष्मा दिसून आला आहे. गेल्या आठवडयात अनेक मालिकांध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्टिस्ट दिसून आले होते. यासगळ्यात स्टार प्लसवर सुरु असणारी अनुपमा पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वोत्तम पाच लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये या मालिकेचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. काही दिवसांपासून अनुपमानं आपलं रँकिंग काही सोडलेलं नाही. त्यामुळे इतर मेकर्स देखील आपली मालिका सर्वोत्तम पाचमध्ये येण्यासाठी मेहनत घेत आहे. मात्र अनुपमापुढे कुणाचे काही चालत नसल्याचे दिसून आले आहे. यावेळी कोणत्या मालिकेला किती रेटिंग मिळाले हे आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

स्टार प्लसवरुन प्रदर्शित होत असलेली अनुपमा ही गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर होती. त्यानंतर वेगवेगळ्या मालिकांसोबत अनुपमाची स्पर्धा होती. मात्र प्रेक्षकांकडून अनुपमाला पसंती मिळाली आहे. सध्या अनुपमाच्या लग्नाची बोलणी सुरु आहेत. त्याचा सीक्वेल प्रेक्षकांना भावतो आहे. त्या दोघांचा साखरपुडाही झाला आहे. आता प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. स्टार प्लसची लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेची मनोरंजकता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे इमलीनं आपल्या स्थानात सुधारणा केली आहे. त्याला 2.1 मिलियनं व्ह्युअरशिप मिळाली आहे.

हेही वाचा: Movie Review- शेर शिवराज.....हिंदवी स्वराज्याचे सुवर्णपान

Web Title: Trp Tv Entertainment Daily Soap Anupamaa Ghum Hai Kisike Pyaar Mein Also Imlie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top