
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच या वादात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी उडी घेत (Social Activist Trupti Desai) केतकीची पाठराखण केली. त्यांच्या या भुमिकेमुळे नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. मात्र, पुन्हा फेसबुक पोस्ट करत तृप्ती देसाईंनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर काही नेटकऱ्यांनी ब्राम्हण या जातीवरुन त्यांना ट्रोल केलं. मात्र, तृप्ती यांनी ताबडतोब ट्रोलर्सना स्पष्टीकरण देत सडेतोड उत्तर दिले आहे.
'मी ब्राह्मण आहे म्हणून केतकी चितळेबद्दल बोलले, अशा ट्रोल करणाऱ्यांना सांगायचं आहे की मी ब्राम्हण नाहीच. पण ज्या 96कुळी मराठ्यांच्या घरातुन येते तिथे मला सर्वधर्मसमभावाचे आणि परखड मत मांडण्याचे संस्कार दिले आहेत.'' आशा आशयाची पोस्ट करत नेटकऱ्यांच्या आरोपावर तृप्ती यांनी पलटवार केला आहे.
केतकीला तृप्ती यांनी दिला पाठिंबा
"आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तिने पोस्ट मध्ये लिहिलेल्या "पवार" या शब्दाने ते नक्की शरद पवारांविषयीच लिहिले आहे का? कारण व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिलेले दिसत नाही. पवार साहेबांविषयी असे त्यांनी जाणून बुजून लिहिले असेल तर चुकीचेच आहे पण केतकी चितळेने जी पोस्ट केली आहे ती चुकीची वाटणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रारी कराव्यात, तिच्याविषयी चुकीचे शब्द वापरून किंवा तिच्याविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपल्याला संस्कार नाहीत हे दाखवू नये." असे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.