तुनिषाच्या आत्महत्येचं कारण लवकरच होणार उघड? पोलिसांना मिळालं CCTV फुटेज| Tunisha Sharma Death Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma News

Tunisha Sharma News : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण लवकरच होणार उघड? पोलिसांना मिळालं CCTV फुटेज

Tunisha Sharma death case : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्माहत्या केल्याच्या प्रकारानंतर या प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना धिसत आहेत. तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद झाला होता अशी माहिती आता समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या वालीव पोलीसांनाी याबद्दल माहिती दिली आहे. मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद झाला होता. वाद झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे आता शीझानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत तुनिषाच्या आईने शीझान, त्याची आई व बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषाच्या आईने आरोपात म्हटलं आहे की, शीझान वेसन करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं.

शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं. जेव्हा मी याबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मी त्याचं काहीच करु शकत नाही, जे करायचं ते करा असं शीझान म्हणाला.

हेही वाचा: Bigg Boss 16 : हिंदी बिग बॉस गोत्यात! जातीवाचक टिप्पणीमुळं SC आयोगाची निर्मात्यांना नोटीस

जर त्याचे दुसऱ्या मूलीसोबत संबंध होते तर तो तुनिषासोबत का रिलेशनमध्ये राहिला, वयातील अंतर आणि धर्मामुळे दोघांचे ब्रेकअप झाले असं शीझान म्हणतोय, मग सुरुवातीलाच प्रेम करताना वयातलं अंतर-धर्म त्याला का कळला नाही? असे तुनिषाच्या आईने म्हटले आहे.

हेही वाचा: Rishabh Pant Accident : पंतच्या अपघातानंतर विराट कोहलीचा खास संदेश, ट्विट करत म्हणाला...

शीझानची आई तुनिषाला त्रास देत असल्याचं देखील तुनिषाच्या आईनं पत्रकार परिषदेत म्हटलं. पूर्ण कुटुंबानं तिचा फक्त वापर केला असल्याचे त्या म्हणाल्या. तिच्याकडून महागडे गिफ्ट घेतले, शीझानच्या बोलण्यामुळं ती खचली होती. शीझानची आई तिला वारंवार फोन करुन तिला मानसिक त्रास देखील द्यायची असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईनं शीझानच्या कुटुंबावर देखील केले आहेत.

आत्महत्येतेपुर्वी तुनिषाने आईला फोन केला होता, तिला ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदीगढला जायचं होतं. दोन दिवसांसाठी ती चंदिगढला जाणार होती. ती खुप खूश होती. मात्र अर्धा तासात असं काय घडलं की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाउल उचललं,असा सवालही तुनिषाच्या आईनं केला आहे.

टॅग्स :crimecctv