Deepesh Bhan Death: 'भाभी जी घर पर है' फेम दीपेशच्या निधनानं बायकोवर आली वाईट वेळ,नोकरी नाही अन् घराचे हप्ते.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhabhi ji ghar par hai fem deepesh death made his wife helpless

'भाभी जी घर पर है' फेम दीपेशच्या निधनानं बायकोवर आली वाईट वेळ,नोकरी नाही अन् घराचे हप्ते..

भाभीजी घर पर है फेन अभिनेता दीपेश भानच्या अचानक जाण्यानं त्याच्या बायकोवर वाईट वेळ येऊन ठेपली आहे. क्रिकेट खेळणं या अभिनेत्याला महागात पडलं. खेळताना हा अभिनेता पडला होता. रूग्णालयात पोहोचेपर्यंत या अभिनेत्याचा मृत्यू झाला. या अभिनेत्याचं गेल्या दोन वर्षाआधीच लग्न झालं होतं. त्याच्या मागे पत्नी आणि १८ महिन्यांचं चिमुकलं बाळ आहे. दीपेशची पत्नी ही गृहिणी आहे. अशावेळी घराचे हप्ते आणि चिमुकल्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या एकटीवर येऊन ठेपलीय. (Bhabhi ji ghar par hai fem deepesh death made his wife helpless)

प्रेक्षकांना सतत हसवणाऱ्या दीपेशच्या अचानक जाण्यानं टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय. तसेच त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांची स्थितीही वाईट आहे. दीपेशचं सोशल मीडिया अकाऊंट बघता दीपेश जीवनात कायम आनंदी आणि दुसऱ्यांना हसवणारा माणूस होता हे कळून येतं.अनेक कलाकारांकडून त्याच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं जातंय.

दीपेशने होमलोन घेतले असल्यामुळे त्याचे मासिक हप्ते आहेत. दीपेशच्या पत्नीला नोकरी नसल्याने आता तिच्यावर घराचे हप्ते भरण्याबरोबरच तिच्या १८ महिन्याच्या लहान बाळाची जबाबदारी येऊन ठेपलीय. दीपेशच्या निधनानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील दीपेशच्या पत्नी आणि बाळाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Tv Actor Deepesh Bhan Wife Have To Face Bad Situation After His Death Have To Pay Home Loan And Responsibility Of 8 Month Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..