उर्फीच्या अंगावर शिंपल्याचे अंतर्वस्त्र, 'समुद्री' लूक पाहून चाहते शॉक|Tv Actress Urfi Javed animal Shell Dress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

उर्फीच्या अंगावर शिंपल्याचे अंतर्वस्त्र, 'समुद्री' लूक पाहून चाहते शॉक

Urfi Javed Animal Sheel See Through Dress: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. सध्या तिचा सागर किनारी एक आगळा वेगळा लूक दिसून आला आहे. तिनं त्याचा खास व्हिडिओही सोशल मीडियावरुन (Viral news) शेयर केला असून चाहत्यांनी तर तिच्या त्या लुकवर डोक्याला हात लावला आहे. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार होईल असं त्यांनी कमेंटसमध्ये म्हटलं आहे. वास्तविक उर्फीच्या फोटोंची दखल घेणं हे नेटकऱ्यांना नेहमीच आवडते. तिच्या यापूर्वीच्या फोटोंना आणि व्हिडिओला नेटकऱ्यांनी विशेष पसंतीची पावती दिली आहे.

उर्फीनं सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट लूक व्हायरल केला आहे. इंस्टावर शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंटसही दिल्या आहेत. तो फोटो आणि व्हिडिओ काही साधारण नाही. त्यात उर्फीनं केलेल्या वेशभुषेची चर्चा आहे. शिंपल्याचा वापर तिनं अंतर्वस्त्र म्हणून केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना त्या लूकनं धक्काच बसला आहे. नेटकऱ्यांनी त्या लुकवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. उर्फीचा तो लूक भलताच बोल्ड आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यापूर्वी तिच्या वेगवेगळ्या लुकला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्या व्हिडिओला केवळ चाहते आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया नव्हे तर काही फॅशन डिझायनर्सच्या देखील कमेंटस मिळाल्या आहेत.

हेही वाचा: Urfi Javed Podcast: ''माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार,भीतीच उरली नाही''

उर्फीला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंस्टावर तिला तीन मिलियन फॉलोअर्स आहे. तिनं काही दिवसांपूर्वी गोव्यामध्ये मित्रांसमवेत पार्टी केली होती. त्याचेही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या तीन मिलियनपेक्षा जास्त झाल्यानं त्या खास पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उर्फी सर्वांना ओरडून 3 मिलियन असं सांगत होती.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Tv Actress Urfi Javed Animal Shell Dress Hot Look Viral On Instagram Fans Shocked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top