काय म्हणावं अशा प्रसिद्धीला? अभिनेत्रीचं टॉयलेटमध्ये फोटोशूट|Tv entertainment Actress Aastha Gill | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aastha gill

काय म्हणावं अशा प्रसिद्धीला? अभिनेत्रीचं टॉयलेटमध्ये फोटोशूट

social media viral news: सोशल मीडियाचा प्रभाव एवढा वाढला आहे की, आता काहीही झालं तरी त्याची माहिती सोशल मीडियावर अपडेट (entertainment news) करण्याची प्रत्येकाला कमालीची घाई झालेली (tv actress) असते. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या (bollywood news) प्रकारचे फोटोशुट (photoshoot) करताना दिसतात. त्यासाठी हटके स्टाईल आणि प्रयोग करताना दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचं फोटोसुट व्हायरल झालं आहे. तिनं चक्क टॉयलेटमध्ये फोटोशुट केलं आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे आस्था गिल. ती नेहमीच आपल्या स्टाईल आणि परखडपणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

आपल्या दमदार आवाज आणि सुंदर गाण्यासाठी आस्था ओळखली जाते. ती आता तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिचे टॉयलेटमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. आपल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या आस्थाचा प्रवास हा वादग्रस्त राहिला आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या आस्थानं यापूर्वी देखील सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेयर केले आहेत. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या वादग्रस्त प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. सध्याचे तिचे फोटो मात्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आस्थानं व्हायरल केलेलं ते फोटोशुट टॉयलेटमधलं आहे. यावेळी तिनं कमोडवर बसून पोझ देत फोटोशुट केलं आहे. आस्थाच्या त्या फोटोंना मीडिया युझर्सनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे तिला लोकांनी ट्रोल केले आहे. दुसरीकडे आस्थानं ट्रोलर्सला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिच्या त्या फोटोंची जोरदार चर्चा आहे.

Web Title: Tv Entertainment Actress Aastha Gill Trolled Toilet Photoshoot Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top