Urfi javed:'भन्साळींनी एकदा संधी द्यावी, मी माझ्या कपड्यांपेक्षा...'

बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री या कायम त्यांच्या बोल्डनेसमुळे ओळखल्या जातात.
Urfi javed
Urfi javed

Urfi Javed: टीव्ही मनोरंजन क्षेत्र आणि बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री या कायम त्यांच्या बोल्डनेसमुळे ओळखल्या जातात. त्यामध्ये बोल्ड (Bollywood Moveis) अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) नावाचा उल्लेख करावा लागेल. सोशल मीडियावर नेहमीच आपल्या बोल्डनेसनं (Entertainment News) उर्फीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjayt Leela Bhansali) यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची चर्चा आहे. या (Gangubai Kathiyawadi) दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा उर्फीनं व्यक्त केली आहे. तिनं त्यांच्याकडे मागणी केली आहे की, मला फक्त एकदा त्यांनी संधी द्यावी. त्यासाठी उर्फीनं आपल्याबद्दल काही वेगळी मतंही आवर्जुन सांगितली आहेत. सोशल मीडियावर नेहमीच बोल्ड अवतारात दिसणाऱ्या उर्फीनं काय स्टेटमेंट केलं आहे हे आपण पाहणार आहोत.

चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री अशी ओळख आता उर्फीची (bold look) झाली आहे. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या वेब सीरिजमध्ये त्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. यावेळी तिनं आपण बोल्ड सीन देताना काही अटी ठेवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं आहे की, दरवेळी मला त्या चित्रपटांवरुन ट्रोल केले जाते. मात्र त्याला फारसा अर्थ नाही. उर्फीला बोल्ड सीनसाठी विचारले असता तिची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली, जर प्रेक्षकांना मी पूर्णपणे बोल्ड अवतारात हवी असेल त्यांना ते पाहणं जास्त आनंददायी वाटत असल्यास मी अशाप्रकारचे सीन यापुढे करणार नाही.

Urfi javed
Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

मला जर भविष्यामध्ये संजय लीला भन्साळी सरांसारख्यांकडून मोठ्या प्रोजेक्टमधून विचारणा झाली तर मी त्याचा गांभीर्यानं विचार करेल. मला वाटतं मी टँलेटेड आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. त्यामुळे मी खूप काही करु शकते. आपण कोणत्याही प्रकारची भूमिका केली तरी प्रत्येकवेळी चाहत्यांना खूश करु शकतो अशी अपेक्षा करणंही चूकीचेच आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचे. मला जर भविष्यात मोठे प्रोजेक्ट मिळाले तर मी त्या दिग्दर्शकांना दाखवून देईन की, मला कपड्यांवरुन जज करु नका. मी त्यापेक्षा अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com