Urfi Javed Video: अंगाला फुलं लावून उर्फीची 'लाईन क्रॉस', जाळ अन् धुर संगच| Tv Entertainment Actress Urfi Javed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed Video: अंगाला फुलं लावून उर्फीची 'लाईन क्रॉस', जाळ अन् धुर संगच

Urfi Javed Flower look: सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या अभिनेत्रींध्ये उर्फी जावेदच्या नावाचा समावेश होतो. अल्पावधीत या अभिनेत्रीनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाय़रल झाला आहे. त्यामध्ये तिनं बोल्डनेसच्या सर्व मर्यादा (Urfi Javed) ओलांडल्याचे दिसुन येत आहे. यापूर्वी देखील उर्फीनं केलेल्या फोटोशुटला (Entertainment News) चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र तिला आपल्या फोटोंवर कोण काय म्हणतं याकडे ती लक्ष देत नाही. नेटकऱ्यांना नेहमीच माझ्या फोटोंवर टीका करायला आवडतं असं तिनं म्हटलं आहे. टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment News) विश्वामध्ये चर्चेत असणाऱ्या उर्फीच्या फोटोंना नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत.

उर्फीनं टॉपलेस (Urfi Topless Photo) होत सर्वांगाला फुलं चिकटवून व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा या फोटोनं ओलांडल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यापैकी एका नेटकऱ्यानं उर्फीला तू तर कमाल केली असून तुझ्या फोटोंनी लक्ष वेधून घेतल्याचे सांगितलं आहे. दुसऱ्यानं उर्फी मनोरंजन विश्वात तुझ्यासारखी अभिनेत्री जेव्हा अशाप्रकारचे फोटो शुट करते तेव्हा ते पाहणं आनंददायी अनुभव असल्याचे सांगितलं आहे. उर्फी ही नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंसाठी चर्चेत आलेली अभिनेत्री आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या फोटोंनी उर्फीनं एक नवा बेंचमार्क सेट करण्याचे काम उर्फीनं केला आहे. तिच्या त्या फोटोंनी काही नेटकरी भलतेच हैराण केले आहे.

हेही वाचा: Viral Video: दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अंगावर फेकतात आगीचे गोळे; 'थूथेधरा'ची अनोखी परंपरा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा तो फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. उर्फीनं कोणतेही कपडे परिधान न करता केलेलं ते फोटोशुट भलतचं चर्चेत आलं आहे. त्या रंगीत फुलांच्या आधारे उर्फीनं स्वताला प्रभावीपणे सादर केले आहे. काही नेटकऱ्यांना उर्फीचा तो अंदाज भावलेला नाही. तिनं अशाप्रकारे केलेलं फोटोशुट हे चिड आणणारे आहे. अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या आहेत.

हेही वाचा: Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

Web Title: Tv Entertainment Actress Urfi Javed Line Cross Bold Photo Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top