Bharti Singh
Bharti Singh esakal

Bharti Singh: शेवटच्या दिवसांपर्यत काम करणारी कॉमेडियन भारती झाली मुलाची आई!

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री भारती सिंगनं (Bharti Singh) अखेर गुड न्युज दिली आहे.

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री भारती सिंगनं (Bharti Singh) अखेर गुड न्युज दिली आहे. ती एका मुलाची आई झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीनं अशीच एक पोस्ट शेयर करुन वेगळी बातमी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता तिनं एक मुलाला जन्म देत चाहत्यांच्या (Social media news) शुभेच्छा स्विकारण्यास सुरुवात केली आहे. कपिल शर्मा शो सारख्या कार्यक्रमामधून सुरुवात करणाऱ्या भारतीनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. सध्या टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी भारतीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी भारतीनं मॅटर्निटी काळातील फोटोशुट करुन लाखो चाहत्यांच्या प्रतिक्रिया त्याला मिळाल्या होत्या.

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री अनिता हसनंदानीनं भारतीचं कौतूक केलं आहे. तिनं भारतीसाठी एक खास पोस्ट देखील शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये ती म्हणते, भारती तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मी आता तुझ्या मुलाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे तिनं म्हटलं आहे. भारतीनं काही दिवसांपूर्वी फोटो शेयर केले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोले केले. अजूनही काम करण्यापेक्षा आराम करावा. आम्हाला गुड न्युज द्यावी. अशी तक्रारवजा सुचनाही भारतीच्या चाहत्यांनी तिच्याकडे केली होती. भारती केव्हा गोड बातमी देते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. अखेर तिच्या पतीनं शेयर केलेल्या पोस्टनं मात्र चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

भारती आणि हर्ष २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले. काही महिन्यापूर्वी त्यांनी भारती प्रेग्नन्ट असल्याची आनंदवार्ता दिली होती. त्यानंतर भारती सतत त्यासंदर्भात अपडेट देत होती. भारती आणि हर्ष हा काळ एन्जॉय करत होते. वेगवेगळे व्हीडीओ आणि फोटोच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. काही महिन्यापूर्वी, 'तू चार मुलं जन्माला घालायला हवीत' अशी मागणी करणारा एक व्हिडीओ हर्ष ने तयार केला होता. त्या व्हिडीओत 'मुल जन्मला घालणे म्हणजे भाजीपाला नव्हे', असे उत्तर भारती हर्षला देते. शिवाय मातृत्वासोबतच करियरही महत्वाचे असल्याची जाणीव त्या दोघांनी चाहत्यांना करून दिली होती. भारतीच्या त्या वेगवेगळ्या व्हिडिओनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे बाळंत होण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत भारती तिच्या कामाममध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे चाहत्यांकडूनही तिला या गोष्टींसाठी खूपच सपोर्ट मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com