तारक मेहता मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'बाघाला' कोरोना | Tanmay Vekaria tests coronavirus positive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanmay Vekaria corona positive
तारक मेहता मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'बाघाला' कोरोना

तारक मेहता मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'बाघाला' कोरोना

ओमीक्रॉनच्या (Omicron) नव्या व्हेरियंटनं सर्वांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यामुळे प्रशासनालाही मोठया समस्यांना सामोरं जावं लागत आहे. लॉकडाऊन झाला नसला तरी पुन्हा पहिल्यासारखे निर्बंध जाहीर करण्यात आले आहे. यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील (Tv entertainment) अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसुन आले आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील बाघा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तन्मय वेकारिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tanmay Vekaria corona positive

वेकारीया (Tanmay Vekaria) यांनी चाहत्यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्यांनी त्या विषयी अधिक माहिती दिली आहे. वेकारिया यांनी लोकप्रिय अशा तारक मेहतामध्ये बाघाची भूमिका साकारली आहे. त्यांना त्या भूमिकेवरुन प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहतामधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या कलाकारांनी होम आयसोलेशन करुन घेतलं आहे. याशिवाय त्यांनी चाहत्यांना देखील आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ओमीक्रॉनच्या वाढणाऱ्या प्रभावामुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा: जगात कोरोना बाधितांची संख्या तीस कोटींवर

covid 19

covid 19

वकारिया यांनी सोशल मीडियावर अधिक माहिती देणारी पोस्ट शेयर केली आहे. वेकारिया यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं आहे की, सर्वांना नमस्कार. आपण सध्या एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत. अशावेळी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. मला आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांत माझ्या संपर्कात जे आले असतील त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी. अशी विनंती मी त्यांना करतो. तन्मय हे तारक मेहतामध्ये बाघाची भूमिका करत आहेत. जो जेठालाल यांच्या दुकानावर काम करतो. चाहत्यांना बाघाची कॉमेडी प्रचंड आवडते. बाघा यांचा चाहतावर्गही मोठा आहे.

हेही वाचा: कोरोना काळात फुफ्फुसांची घ्या काळजी, 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top