Saas Bahu Achaar Pvt. Ltd: अभिनेत्री अमृता सुभाष लोणचं का विकतेय?

Saas Bahu Achaar Pvt. Ltd: मराठी - हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.
amruta subhash news
amruta subhash news esakal

Saas Bahu Achaar Pvt. Ltd: मराठी - हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. सोशल (Amruta Subhash) मीडियावर देखील ती नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय असते. वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून तिनं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. प्रख्यात (social media viral news) नाट्यअभिनेत्री म्हणूनही अमृतानं स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. वुमन्स डेच्या निमित्तानं झी 5 आणि टीव्हीएफने एका मालिकेची घोषणा केली होती. त्या मालिकेचे नाव 'सास बहू आचार प्राइवेट लिमिटेड' असे होते. आता पुन्हा ही वेबसीरिज चर्चेत आली आहे.

सहा भागांतील ही मालिका ही येत्या 8 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या (entertainment news) मालिकेत नॅशनल अॅवॉर्ड पुरस्कार विजेती अमृता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिचा लोणचं विकतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो पाहून नेटकऱ्यांना या मालिकेची मोठी उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. या मालिकेमध्ये अमृताबरोबरच यामिनी दास, अनुप सोनी, अंजना सुखानी आणि आनंदकेश्वर द्विवेदी यांच्या देखील भूमिका आहेत. त्याची निर्मिती अरुणाभ कुमार आणि अपूर्व सिंह यांनी केली आहे. त्याचे लेखन अभिषेक श्रीवास्तव आणि स्वर्णदीप बिस्वास यांनी केले आहे.

'सास बहू आचार प्राइवेट लिमिटेड' या मालिकेविषयी अधिक माहिती द्यायची झाल्यास, जुन्या दिल्लीतील चांदणी चौकात राहणाऱ्या एका महिलेची ही गोष्ट आहे. तिचे नाव सुमन असे आहे. सुमनची भूमिका अमृता सुभाषनं केली आहे. सुमनच्या सासूची भूमिका यामिनी दास यांनी केली आहे. या मालिकेमध्ये अमृताचं आपल्या पतीसोबतचं नातं थोडं कडवट आहे तर सासूबरोबरच तिचं नातं प्रेमळ असल्याचे दाखवण्यात आले आहे.

amruta subhash news
Teaser Viral : डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप'!

या मालिकेचा ट्रेलर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्या ट्रेलरमध्ये सासू ज्योतिषाला म्हणते की, माझ्या मुलीचा हात पाहा. ज्योतिषी म्हणतात की, तुमच्या हातावर तर शनि रेखा नाही. त्यानंतर सुमनच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ येते. तिच्या आयुष्यामध्ये ज्याप्रकारचे वादळ येते त्याची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. ज्योतिषाच्या उत्तरावर सुमन सांगते की, हातावरील रेषा काही आपलं भविष्य घडवू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की, आम्ही कर्मच करायचं नाही.

amruta subhash news
Video: जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com