जिंकल्यानंतर पवनदीपनं अरुणिताशी केली 'मन की बात' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिंकल्यानंतर पवनदीपनं अरुणिताशी केली 'मन की बात'

जिंकल्यानंतर पवनदीपनं अरुणिताशी केली 'मन की बात'

आपल्या गायकीनं पवनदीपनं pawandeep rajan प्रेक्षकांना जिंकून घेतलं. त्याबरोबर त्यानं यंदाच्या इंडियन आयडॉलच्या बाराव्या सीझनचं विजेतेपदही मिळवलं. गेल्या काही दिवसांपासून पवनदीपविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. यावर्षी त्या शो चं विजेता कोण होणार यावर चाहत्यांमध्ये स्पर्धा होती. त्यात पवनदीपचं नाव चर्चेत होतं. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. आणि बहुमतानं त्यानं विजेतेपद मिळवलं. सध्या त्याच्यावर देशभरातून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यासगळ्यात त्याच्या आणि अरुणिता कांजीलाल arunita kanjilal यांच्या रिलेशनचीही चर्चा होताना दिसत आहे. त्यावर आता त्या गायिकेनचं एक खुलासा केला आहे. ती काय म्हणाली जाणून घेऊयात.

प्रेक्षकांना यंदाच्या इंडियन आयडलचा विजेता कोण होणार याची मोठी उत्सुकता होती. अखेर त्यांना त्यांच्या मनातील विजेत्याचं नाव कळलं आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पवनदीप हा विजेता ठरला तर अरुणिता दुसऱ्या आणि सायली कांबळे तिसऱ्या स्थानावर होती. पवनदीपला ट्रॉफीसोबत २५ लाख रुपयांचा धनादेशही मिळाला. विजेतेपद मिळवल्यानंतर पवनदीपनं मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला, मला फार आनंद झाला. विजेतेपद मिळवण्याचा आत्मविश्वास होता. आणि मेहनतीचं फळ मिळालं आहे. आतापर्यतच्या संघर्षासाठी मी आनंदी आहे. त्यानंतर त्याला त्याची खास मैत्रीण अरुणिता कांजीलाल हिच्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर सर्वांना चक्रावून टाकणारं होतं.

पवनदीपनं इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना सांगितलं की, जेव्हा मी ती ट्रॉफी हातात घेतली त्यावेळची भावना वेगळीच होती. तो आनंद वेगळा होता. तो काही शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पवनदीपला अरुणिताविषयी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, आम्हाला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी वेळच मिळाला नाही. बोलण्यासाठी देखील फुरसत नव्हती. तिनं मला विजेता झाल्यावर शुभेच्छाही दिल्या. आनंद झाला. तुझ्या विजेतेपदावर मी खूप आनंदी आहे. अशी प्रतिक्रिया तिन त्यावेळी दिली होती. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं.

हेही वाचा: कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता आनंद कन्नन यांचे निधन

हेही वाचा: 'ती बोगस अभिनेत्री', विधू विनोद चोप्रा कुणाबद्दल बोलले?

गेल्या काही दिवसांपासून अरुणिता आणि पवनदीप यांच्याविषयी मीडियामध्ये चर्चा रंगली होती. त्यांच्यातील मैत्री आता त्यांच्या चाहत्यांसाठी वेगळा विषय झाला आहे. या शो च्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा त्या दोघांविषयी रंगल्या होत्या. ते रिलेशनशिपमध्ये आहे. अशीही जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती. अनेकांनी त्यावेळी रियॅलिटी शो जास्तीत जास्त लोकप्रिय होण्यासाठीचं हे गिमिक असल्याचं चाहत्यांचं म्हणणं होतं. अरुणितानं देखील शेवटपर्यत पवनदीप बरोबर आपली मैत्री असल्याचे सांगितले होते.

Web Title: Tv Indian Idol 12 Winner Pawandeep Rajan Arunita Kanjilal Feelings After His Being Winner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top