सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी टीव्ही कलाकार आले एकत्र; सोशल मीडियावर शेअर केल्या आठवणी

संतोष भिंगार्डे
Saturday, 8 August 2020

अंकिता लोखंडे ते रवि दुबेपर्यंत अनेक टीव्ही स्टार ट्विटरवर #वॉरियर्स4एसएसआर ट्रेंड करत सत्य समोर आलेच पाहिजे अशी मागणी सगळे करत आहेत.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयच्या अख्यतारित गेला आहे. आतापर्यंत झालेल्या तपासादरम्यान या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. चाहत्यांसह अनेक सेलेब्स सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. आता टीव्ही कलाकारही पुढे सरसावले आहेत. अंकिता लोखंडे ते रवि दुबेपर्यंत अनेक टीव्ही स्टार ट्विटरवर #वॉरियर्स4एसएसआर ट्रेंड करत सत्य समोर आलेच पाहिजे अशी मागणी सगळे करत आहेत.

हातमागावरील वस्त्रांना प्रोत्साहन द्या; बॉलीवूड अभिनेत्रींनी केले महत्वपूर्ण आवाहन

सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने सुशांतच्या आईचा फोटो हातात धरला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, "निश्चितच तुम्ही दोघे एकत्र असाल. #वॉरियर्स4एसएसआर." तसंच टीव्ही अभिनेता रवी दुबे यांनी ट्विटरवर सुशांतचा एक फोटो शेअर करत असे लिहिले आहे की, 'खासकरुन सुशांतच्या वडिलांसाठी या केसचा न्याय झाला पाहिजे. आम्ही सुशांतच्या वडिलांच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत. आपण सर्वांनी विजयासाठी प्रार्थना करूया.'

शैक्षणिक वर्ष तर सुरु झाले, मात्र विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांपुढे अडचणींचाच डोंगर

त्याचप्रमाणे 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेता रोहन मेहराने सुशांत आणि त्याची बहीण श्वेता यांचा एक फोटो शेअर केला. त्यावर लिहिले होते की, "आपण नक्की जिंकू. #वॉरियर्स4एसएसआर". सुशांतचा जवळचा मित्र निर्माता विकास गुप्ताने सुशांतची बहीण आणि पूर्वीची गर्लफ्रेंड अंकितासोबतचा फोटो कोलाज करून ट्विट केला आणि लिहिले की, 'तो स्वत: चांगला माणूस होता, त्यामुळे त्याला इतर लोकंही चांगलीच  वाटायची आणि त्यांच्यावर तो विश्वास ठेवायचा. पण सगळीच माणसं चांगली नसतात. त्याने अनेक लोकांचं भलं केलं परंतु ते सर्वच लोक वाईट निघाले. आता सुशांतसोबत उभे राहण्याची, त्याच्याबद्दल प्रेम दाखवण्याची वेळ आली आहे. #वॉरियर्स4एसएसआर"

...म्हणून लोकलची प्रवासी क्षमता वाढवायला हरकत नाही; टाटा इन्स्टिट्यूटने दिली महत्वाची माहिती

याशिवाय अभिनेता अर्जुन बिजलानीने इंस्टाग्रामवर पेटत्या मेणबत्तीचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, "सुशांतचे काय झाले हे आम्हा सर्वांना जाणून घ्यायचे आहे." सुशांतचे 14 जून रोजी निधन झाले आणि आता त्याबाबतचे अनेक खुलासे समोर येत आहेत. सुशांतला न्याय मिळावा यासाठी सेलिब्रिटीपासून सामान्य लोकांपर्यंत सर्व एकत्र आले आहेत आणि सुशांतच्या वडिलांच्या पाठीशी उभी राहिली आहेत. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv industry artists came together for justice to sushant singh rajput, social media trends