Twinkle Khanna: स्त्री पुरुष समानता म्हणजे डबल काम आणि...! 'फेमिनिझम' वर अक्षयची पत्नी ट्विंकल काय बोलून गेली?

फेमिनिझमवर ट्विंकल जे बोलली त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. तिचं ते वक्तव्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
Twinkle Khanna Discussed about feminism
Twinkle Khanna Discussed about feminismesakal

Twinkle Khanna Discussed about feminism : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना ही आता लोकप्रिय लेखिका झाली आहे. ती एक स्तंभलेखिका म्हणूनही लोकप्रिय आहे. तिच्या नावाचा वेगळा चाहतावर्ग आहे. अभिनयासोबतच तिनं एका वेगळ्या क्षेत्रात स्वताच्या नावाचा ठसा उमटविल्याचे दिसते आहे.

ट्विंकल ही स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली सेलिब्रेटी असून ती नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते. आपलं म्हणणं तितक्याच प्रभावी आणि ठामपणे मांडण्यात ती नेहमीच सक्रिय राहिली आहे. आता तिनं एका कार्यक्रमामध्ये फेमिनिझमवर मांडलेलं मत हे चर्चेत आलं आहे. खरं तर यापूर्वी वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी फेमिनिझमवर व्यक्त केलेल्या मतांमुळे वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

ट्विंकलनं तिच्या त्या वक्तव्यामध्ये आपल्याला एकाचवेळी किती वेगवेगळया भूमिका पार पाडाव्या लागतात याविषयी सांगितले आहे. तिनं लग्नामध्ये देखील आता समानता हवी असे सांगताना फेमिनिझमविषयी तिची मतं मांडली आहेत. घरगुती काम करताना महिलेली किती वेगवेगळ्या भूमिकेतून जावे लागते याचा विचार कुणीही करत नाही. आपण महिला स्वताला फार प्रगतीशील समजतो मात्र त्यातील बाकीच्या पैलुंचा विचार करत नाही.

जॉब करुन बाकी घरातले कामही करावे लागते. अशावेळी आपण समानता म्हणतो पण ती असते का, मी समानतेला खूपच सपोर्ट करते पण समानता म्हणजे दुप्पट काम असे नाही. ते चूकीचे आहे. तुम्ही जर मला सपोर्ट करता तर तुम्हीही मी करत असलेल्या कामामध्ये सहभाग घ्यावा. मी प्रत्येक गोष्ट दुपटीनं करणं हे चूकीचे असल्याचे मत ट्विंकलनं मांडलं आहे.

Twinkle Khanna Discussed about feminism
Poonam Pandey Fake Death: स्वत:च्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे गुन्हा आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

तुम्ही जर कोणते कामच करत नसाल तर त्यावर काय बोलायचे, तुम्ही जेव्हा कोणतेही काम करता तेव्हा त्यात पूर्णपणे समर्पित असता. मी खूप काही व्यक्त होत आहे याचे कारण मी पूर्ण त्या प्रोसेसमधून गेली आहे. त्याचे फायदे तोटेही मला माहिती आहेत. असे ट्विंकलनं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com