'कॉफी विथ करण' मध्ये सामिल न होण्याचा ट्विंकलचा निर्णय; कारणही सांगितलं...Twinkle Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Johar & Twinkle Khanna

'कॉफी विथ करण' मध्ये सामिल न होण्याचा ट्विंकलचा निर्णय; कारणही सांगितलं...

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर ट्विंकल चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. मग कधी ते फोटो,कधी व्हिडीओ तर अगदी फनी मेसेज देणारं काहीतरी...असं बरंच काही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पहायला मिळतं.

हेही वाचा: ऑडिशन टेपमध्ये कार्तिकला 'त्या' अवस्थेत पाहून आईला बसला होता धक्का

नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिनं एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती केसांना रोलर लावून आहे. आणि हातात चहाचा कप घेऊन,चहा पितानाही दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहते भलतेच खूश झालेयत. पण सर्वात अधिक तर ट्विंकलनं तिच्या या पोस्टला जे कॅप्शन दिलं आहे ते वाचून चाहते भलतेच उत्साहित झाले आहेत. कारण ट्विंकल खन्नानं त्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''ती दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या(Karan Johar) 'कॉफी विथ करण'मध्ये(Koffee with karan) सहभागी होणार नाही. तिनं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. आणि ते जाणून घेतल्यावर चाहत्यांना मात्र आनंदानं आकाशही ठेंगणं झालं आहे.

ट्विंकल खन्नानं आपला एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर करत त्याला एक कॅप्शन दिलं आहे,''केसांना रोलिंग करत आहे. सेटवर आहे आणि माझी सारखी बडबड करण्याची एक वाईट सवय आहे. मला शूट करा. म्हणजे मला म्हणायचं होतं,बंदूकींन नाही,कॅमेऱ्यानं शूट करा. आता कॉफी विथ करणमध्ये पुन्हा जाण्यात इंट्रेस्ट नाही पण टी विथ ट्विंकल ही पण काही वाईट कल्पना नाही''.

हेही वाचा: अंधश्रद्धाळू कियारा; एखादा सिनेमा साइन करेपर्यंत 'ही' गोष्ट मूळीच करत नाही

ट्विंकल खन्नाचं हे म्हणणं ऐकल्यानंतर मात्र तिचे चाहते भलतेच खूश झाले आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे,''तुम्ही नक्कीच टी विथ ट्विंकल हा शो घेऊन या,खूप मस्त होईल''. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं आहे,''कृपया,तुम्ही लवकर टी विथ ट्विंकल शो आणा आणि त्यामध्ये करण जोहरला बोलवा''. तर तिसऱ्या एकानं लिहिलंय,''तुमचा शो कॉफी विथ करण ला चांगलीच टक्कर देईल''. आणि ''तुमचा शो माहितीपूर्ण,मजेदार विनोद आणि ह्युमर अशा विविध रंगांनी भारलेला असेल'' असं देखील एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

Karan Johar & Twinkle Khanna

Karan Johar & Twinkle Khanna

करण जोहर पुन्हा कॉफी विथ करण 7 हा प्रसिद्ध शो घेऊन आपल्या भेटीला येत आहे. यावेळेला शो हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. शो मध्ये कोणकोणते गेस्ट सामिल होणार आहेत याविषयी नेहमीच नवनवीन खुलासे होत आहेत. यामध्ये आलिया भट्ट,रणवीर सिंग,मलायका अरोरा,अर्जुन कपूर,सारा अली खान,जान्हवी कपूर अशा सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत.

Web Title: Twinkle Khannas Decision Not To Join Koffee With Karan 7 The Reason Was Also

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top