esakal | ट्विटरनं कंगणाला केलं 'रन आऊट', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut
ट्विटरनं कंगणाला केलं 'रन आऊट', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या बेताल वक्तव्यानं कायम चर्चेत असणा-या कंगणाला Kangana Ranaut ट्विटरनं चांगलाच दणका दिला आहे. यापूर्वीही तिला अशाप्रकारे अद्दल घडवण्याचा प्रयत्न ट्विटरनं केला होता मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कंगणा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे आपण चर्चेत कसे राहु यासाठी प्रयत्नशील असते. नुकताच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहेत. मात्र त्यावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट कंगणान Kangana Ranaut शेअर केली आणि मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. तिच्या अशाप्रकारच्या ट्विटरनं नसता तो परिणाम आपल्याला सहन करावा लागेल असा विचार करुन ट्विटरनं तिचे अकाऊंट बंद केले आहे.

ज्यावेळी तिचे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे सोशल मीडियावर पसरले त्यानंतर मोठ्या प्रमाणात तिच्यावर टीकाही करण्यात आली. यावेळी अनेकांनी तिला ट्रोलही केले. कंगणाची Kangana Ranaut अशाप्रकारे व्यक्त होण्याची नेहमीची सवय आहे. त्याचे तिला काहीही वाटत नाही. ट्विटरनं एकदा का होईना तिला अद्दल घडवावी अशाप्रकारच्या कमेंट तिला देण्यात आल्या आहेत. आणखी एका नेटक-यानं कंगणाला सुनावले आहे की, नेहमी अशा प्रकारे भडकावणा-या पोस्ट लिहून कंगणाला काय साध्य करायचं असतं कुणास ठाऊक. सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी न होता अशाप्रकारे माथी भडकावण्याचं काम केलं जात असेल तर त्याचा विचार केला जातो. ही भावना एका नेटक-यानं व्यक्त केली आहे.

काहींनी कंगणाचे गंमतीशीर स्केच तयार केले असून ते पोस्ट केले आहे. वेगवेगळ्या प्रकारे कंगणाचे कार्टूनही काढण्यात आले आहे. सध्या कंगणा सोशल मीडियावरील सर्वात चर्चिला जाणारा विषय आहे. तिनं सकाळपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर नेटक-यांनी तिला ट्रोल करताना शेलक्या शब्दांचा वापर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगणाने ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे. (Kangana Ranaut Twitter account suspended for violating rules)

हेही वाचा: कोरोना रूग्णांसाठी 'देसी गर्ल'ने जमवला पाच कोटींचा निधी

हेही वाचा: कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड

वांद्रे कोर्टात तिच्याविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगणाने तृणमूल काँग्रेस पार्टी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ट्विट केलं होतं. तिने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. ज्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या महिलांना मारहाण केली जात होती.