Udaipur Kanhaiya lal killing: 'तुला काय माहिती इस्लाम?' उर्फीला धमकी| Udaipur Murder case tv actress urfi javed comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress urfi javed

Udaipur Kanhaiya lal killing: 'तुला काय माहिती इस्लाम?' उर्फीला धमकी

Udaipur Murder case : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही चर्चेत आली आहे. तिनं सध्या सर्वाधिक चर्चेत आलेल्या उदयपूर प्रकरणावर (tv entertainment news) प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अनेकांना तिची प्रतिक्रिया (Actress urfi javed) आवडल्यानं त्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी तिला धमकावले आहे. यासगळ्यांविरोधात उर्फीनं पोलिसांकडे धाव घेतली आहे. आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून उर्फीचे नाव घ्यावे लागेल. यापूर्वी देखील तिनं तिच्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजस्थानातील उदयपूर शहरात कन्हैया लाल (kanhaiya lal) याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद देशभर तीव्रपणे उमटताना दिसत आहे. त्यावरुन राजस्थानात (social media viral news) कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिथं कलम 144 लागू करण्यात आले आहे. उदयपूर येथील हत्याकांडाचा बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत, स्वरा भास्कर, जॉन अब्राहम, संगीतकार विशाल ददलानी यांच्या नावाचा समावेश आहे.

उर्फीनं सोशल मीडियावरुन त्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, अल्लाहच्या नावावर आणि धर्माला मध्ये आणून कशाप्रकारची कृत्य केली जात आहे? यासगळ्याचा निषेध करण्याची गरज आहे. इंस्टावर उर्फीची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आणि त्याचा कडाडून नेटकऱ्यांनी समाचार घेतला. काहींनी उर्फीला धमकीही दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तिनं पोलिसांकडे धाव घेतली आहे.

urfi application

urfi application

हेही वाचा: Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

एका युझर्सनं उर्फीच्या प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट शेयर केला असून त्यावर अश्लील प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर उर्फीनं मुंबई पोलिसांकडे त्याबाबत तक्रारही दिली आहे. त्या युझर्सनं उर्फीला शिवीगाळ केली आहे. तुला इस्लामविषयी काय माहिती आहे असा प्रश्न विचारुन ज्याबद्दल काही माहिती नाही त्याविषयी बोलायचे नाही. अशा भाषेत तिला धमकी दिली आहे.

हेही वाचा: 'हिंदू असल्याची मला लाज वाटते'; नमाजचा 'तो' व्हिडीओ पाहून संतापली स्वरा भास्कर

Web Title: Udaipur Murder Case Tv Actress Urfi Javed Comment Trolled By Users Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..