'ऑस्कर' अकादमीच्या समितीवर मराठी झेंडा ; उज्वल निरगुडकर यांची निवड

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

 ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर त्यांची निवड झाली आहे. ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.

मुंबई -मराठी माणसाला सुखावणारी आणि त्याच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी मराठी माणसाची निवड झाली आहे. आता 'ऑस्कर'ला असलेली प्रतिष्ठा, मान आणि त्याचा दरारा याची बात काही औरच आहे.

ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर त्यांची निवड झाली आहे. ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. ऑस्करचा एक भाग होता येणे महत्वाची बाब आहे.

आम्हाला स्वीकारण्यात 'जात' आड आली; नवाझुद्दिन सिध्दिकीची सल

ऑस्कर अकादमी त्याच्या संपूर्ण नावातील 'आर्ट्स'प्रमाणे 'विज्ञान' विभागासाठीदेखील तितकीच कार्यक्षम असते. कलाकार, चित्रपट यांच्या पुरस्कारांप्रमाणे त्यासंबंधी असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीही पुरस्कार दिले जातात. त्याची निवड करण्याचं काम विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीकडे असतं. या समितीत २१ सदस्य असतात. यामध्ये दरवर्षी काही नवीन सदस्य घेतले जातात.

ख्रिस्तोफर नोलानच्या ''टेनेट'' चित्रपटाने केला धूर; कोरोनातही ठरला ''सुपरहिट''

विज्ञान आणि तंत्रज्ञान समिती २००३ मध्ये स्थापन झाली. १७ वर्षांत समितीमध्ये उज्वल हे भारतीय नागरीकत्व असलेले पहिले भारतीय आहेत. यापूर्वी त्या समितीवर अमेरिकन नागरिकत्व असलेल्या भारतीयांची नेमणूक झालेली आहे. याविषयी त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, भारतीय मनोरंजनविश्वातील तांत्रिक समस्यांबाबत समितीमध्ये चर्चा होऊ शकते. तसंच तिथल्या तंत्रज्ञानाचा भारतीय चित्रपटांसाठी फायदाही होऊ शकतो. आपल्याकडचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम होतील यासाठी काम करता येणे शक्य आहे. 

अक्षयच्या ''लक्ष्मी बॉम्ब'' चा फाडू ट्रेलर पाहिलायं ?; मग एकदा बघाच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujwal Nirgudkar Appointed Oscars Academy's Science & Technology Council