प्रिया बापटसोबत तुलना करणाऱ्यांना उमेशचं सडेतोड उत्तर

सेलिब्रिटी पती-पत्नी एकाच क्षेत्रात काम करत असतील तर कधी ना कधी चाहत्यांकडून त्यांच्या कामाची तुलना होणे स्वाभाविक आहे.
priya bapat and umesh kamat
priya bapat and umesh kamat

सेलिब्रिटी पती-पत्नी एकाच क्षेत्रात काम करत असतील तर कधी ना कधी चाहत्यांकडून त्यांच्या कामाची तुलना होणे स्वाभाविक आहे. मराठीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट Priya Bapat आणि उमेश कामत Umesh Kamat यांच्या बाबतीत नुकतंच असं घडलं. प्रियाच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स २'ला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रियाच्या कामासोबत काही वेळा उमेशची तुलना केली जाते. या तुलनेवरूनच उमेशला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारला गेला. त्यावर उमेशनेही तुलना करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

एका मराठी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उमेश म्हणाला, "मला आणि प्रियाला यामुळे काही फरक पडत नाही. मला हिंदीत काम करण्याचं आकर्षण कधीच नव्हतं. अभिनय म्हणून करिअर निवडताना फक्त चांगलं काम करायचं ठरवलं. त्यामुळे हिंदी असो किंवा मराठी, त्याने फरक पडत नाही. हिंदीत चांगली संधी मिळाली तर नक्कीच करेन. पण आता मला मराठी इंडस्ट्रीत उत्तम काम मिळतंय तर ते का मी सोडावं? एकमेकांच्या कामाचं कौतुक होत असेल तर आम्हा दोघांना सारखाच आनंद होतो."

priya bapat and umesh kamat
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर समोर आला शहनाजचा व्हिडीओ

उमेश सध्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत उमेशसोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. बऱ्याच वर्षांनंतर उमेशने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. तर दुसरीकडे प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रीम्स २' ही वेब सीरिज चांगलीच गाजली. 'आणि काय हवं'चा तिसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन सिझनलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com