कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच येणार बायोपिक

वृत्तसंस्था
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

प्रख्यात कायदेतज्ञ आणि अनेक महतत्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच बायोपिक तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या कोण त्यांच्यावर बायोपिक तयार करत आहे ! 

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या रिअल एव्हेंट आणि बायोपिकवर अनेक सिनेमे तयार होत आहेत. अनेक महत्त्वपूर्ण घडलेल्या घटनांवर बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेंडच सुरु झाला होता. आताही प्रख्यात कायदेतज्ञ आणि अनेक महतत्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच बायोपिक तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या कोण त्यांच्यावर बायोपिक तयार करत आहे !    

रणबीर-आलियाचं शुभमंगल! 'या' महिन्यात होणार लग्नं... 

अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 2012 मध्ये 'ओह माय गॉड' हा सिनेमा आला होता. अनेक महत्तवपूर्ण विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा उमेश शुक्ला यांनी दिग्दर्शित केला होता. उमेश यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ते लवकरच उज्ज्वल निकम यांच्यावर आधारीत बायोपिक घेऊन येत आहेत. 

वकील उज्ज्वल निकम यांनी आजवर अनेक महत्त्वाचे खटले लढले आहेत आणि त्यात यशही मिळवलं आहे. 'निकम' असं या बायोपिकचं नाव असणार असून त्यामध्ये 1993 बॉम्ब ब्लास्ट, 26/11 हल्ला, टी-सिरिज चे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या, भाजप नेते प्रमोद महाजन यांची हत्या अशा अनेक घटना ज्यापद्धतीने उज्ज्वल निकम यांनी हाताळल्या ते यामध्ये दाखविण्य़ात येणार आहे. 

कतरिनासोबतच्या रिलेशनशिपवर विकी म्हणतो, ''प्रेम ही बेस्ट फिलिंग आहे''

चित्रपटाच्या कथेचं लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत. एका मुलाखतीदरम्यान उज्ज्वल निकम म्हणाले, '' मी एखादं पुस्तक लिहावं किंवा माझ्यावर एखादा बायोपिक तयार व्हावा अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. पण, माझ्यावर बायोपिक तयार व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तेवढा पुरेसा वेळही नाही. अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. पण, या सिनेमाची टीम माझ्याकडे आली आणि त्याची ही संकल्पना मला पटली. या सिनेमातून आणि कथेतून अनेकजण प्रेरित होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच मी या बायोपिकसाठी तयार झालो.''

सेलिब्रिटी वीकएण्ड : ‘संडे’ आमच्यासाठी ‘फन डे’

सिनेमाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला हे या सिनेमाबाब बोलताना म्हणाले,'' आम्ही एका अशा व्यक्तीवर सिनेमा तयार करत आहोत ज्यांच्यामुळे लोक प्रेरित होतील. हिरो फक्त स्टाइल करणार असतात असं नाही पण, खऱ्या आयुष्यातही अनेक हिरो असतात. त्यांपैकी एक आहेत उज्ज्वल निकम.'' उमेश शुक्ला यांनी ‘ओह माय गॉड’, ‘102 नॉट आऊट’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umesh Shukla to make biopic on Advocate Ujjawal Nikam