'अबु सालेमला सोडायचं होतं, त्याच्या माणसांनी हॉटेलमधून उचलून आणलं'

अभिनेत्री मोनिका बेदी (Bollywood actress Monika Bedi) ही 90 च्या दशकामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारी अभिनेत्री होती.
Monica Bedi
Monica Bedi

अभिनेत्री मोनिका बेदी (Bollywood actress Monika Bedi) ही 90 च्या दशकामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारी अभिनेत्री होती. तिच्या नावाची वेगळी ओळख तयार झाली होती. तिचा संबंध जेव्हा गुन्हेगारी जगताशी (Mumbai Underworld) यायला लागला तेव्हा मात्र बॉलीवूडमधला (bollywood) तिचा प्रवास संपुष्टात आला. जोडी नंबर 1, प्यार इश्क और मोहब्बत सारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं होतं. मात्र प्रेक्षकांचा तिला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील दिसली होती. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली होती. गँगस्टर अबु सालेमची (Don Abu Salem) प्रियसी म्हणून तिची ओळख झाली होती. त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. सरस्वती चंद्र नावाच्या मालिकेमध्येही ती चमकली होती.

आज मोनिका बेदीचा (Happy Birthday Monika bedi) जन्मदिवस आहे. यानिमित्तानं तिच्याविषयीच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मोनिकाला काही दिवस जेलमध्येही जावं लागलं होतं. तिचा गुन्हेगारी जगताशी असलेला संबंध हा तिला अनेक संकटांच्या रस्त्यावरुन घेऊन गेला. ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातून तिला बाहेर येण्यासाठी अनेकांची मदतही घ्यावी लागली. मोनिका बेदी आणि अबु सालेमची लवस्टोरी एका वेगळ्या संकटातून पुढे आली आहे. त्याची नेहमी मोनिकाच्या चाहत्यांमध्ये चर्चा असते. भलेही आता तिच्या नावाला तितकसं ग्लॅमर नसलं तरी मोनिका आणि अबु सालेमच्या नावाची चर्चा होत असते. त्या दोघांनी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं.

Monica Bedi
'अल्लु' इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा साऊथचा पहिला सुपरस्टार

मोनिका बेदीच्या दिसण्यावर अबु सालेम फिदा झाला होता. दुबईमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यानं मोनिकाशी संपर्क केला आणि त्यांच्यात फोनवरुन संभाषण होऊ लागलं. फिल्मफेयरच्या एका मुलाखतीमध्ये मोनिकानं सांगितलं होतं की, 1998 मध्ये दुबईतील एका शो च्या दरम्यान माझी आणि अबु सालेमची भेट झाली होती. त्यावेळी त्यानं आपली ओळख वेगळ्या नावानं सांगितली होती मुंबईत आल्यावर तो नेहमीच आपल्या संपर्कात राहिला. दर अर्ध्या तासाला तो मला फोन करत असे. मी अनेकदा अबु सालेमच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र मला काही यश आले नाही. मला एका हॉटेलमधून शोधून परत आणले गेले होते. लोकांना वाटत होतं की, मी अबु सालेमजवळ एका राजकुमारी सारखी राहत असेल मात्र मी नेहमीच वेगळ्या परिस्थितीमध्ये जगत होते. जिथे मला घरातली सगळी कामं करावी लागल्याचे मोनिकानं सांगितलं होतं.

Monica Bedi
अखेर घटस्फोटाबाबत नाग चैतन्यने सोडलं मौन; म्हणाला "जर समंथा खूश असेल.."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com