
Uorfi Javed Video: घर, बंदूक आणि उर्फी! आता तर काही खरं नाही...व्हिडिओ व्हायरल
Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद हे असं नावं आहे की ज्याला परिचयाची गरज नाही. म्हणजे असं काही मोठं नावही नाही मात्र तिच्या अतरंगी फॅशनमुळं ती चर्चेत असते. सोशल मिडियावर पाहिलं तर तिच्या फॅशनचा व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतो.
तिच्या चाहत्यांची सख्यांही बरिच आहे. तिला 4 मिलिअनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आपण कल्पनाही नाही करु शकत अशा वस्तूंचे ड्रेस तयार करुन ती परिधान करत असते.
उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम तुमच्या कल्पने पलिकडे फॅशन असलेले ड्रेस व्हिडिओ व्हायरल होत असतात.
आता पुन्हा तिचा नवीन लूक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिनं यामध्ये असं काही घातलं आहे की ज्यामुळे नेटकऱ्यांनी डोक्याला हातच मारला आहे. उर्फी जावेद नुकतिच मुंबईत स्पॉट झाली होता. यादरम्यान अभिनेत्रीचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळाला.
उर्फी जावेदचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये उर्फी जावेदने पारदर्शक टॉप घातलेला दिसत आहे. या पारदर्शक टॉपवर बंदुकीची डिझाइन तयार केले आहे. उर्फीने या टॉपसोबत काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे.
यावेळी तिच्या मिनि स्कर्टची डिझाईनही वेगळी होती. या ड्रेससह तिने तिच्या नाकात नथ घातली आहे. केसांचा बन घातला होता. त्यासोबतच तिने बरेच दागिनेही घातले आहेत. कमीत कमी मेकअप सह तिने हा लूक पुर्ण केला.
जेव्हा तिला या ड्रेसबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तिने सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवरील डिंपल कपाडियाची सास, बहू आणि फ्लेमिंगो या सिरिज पासून उर्फी जावेद खूप प्रभावित झाली होती. त्यामुळए तिने हा ड्रेस परिधान केला आहे. उर्फी स्वतः या व्हिडिओमध्ये ही माहिती देताना दिसत आहे. उर्फी जावेदचा हा लेटेस्ट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.