Urfi Video Viral : उर्फीचा गॉगल पाहून रावणाची वाढली असती डोकेदुखी!

हटके फॅशन, स्टाईल यासाठी उर्फी ओळखली जाते. उर्फीला कोणतीही गोष्ट फॅशनसाठी पुरते हे तिनं अनेकदा तिच्या व्हिडिओतून दाखवून दिले आहे.
Urfi Javed tv actress funny video
Urfi Javed tv actress funny videoesakal

Urfi Javed tv actress funny video : मनोरंजन क्षेत्रात असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी काहीही केले तरी ते चर्चेत येतात. लाईमलाईटमध्ये चमकतात. अशा सेलिब्रेटींपैकी एक म्हणजे उर्फी जावेद. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नेहमीच बातमीचा विषय असणाऱ्या उर्फीनं कमी वेळेत स्वताच्या नावाची वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे.

हटके फॅशन, स्टाईल यासाठी उर्फी ओळखली जाते. उर्फीला कोणतीही गोष्ट फॅशनसाठी पुरते हे तिनं अनेकदा तिच्या व्हिडिओतून दाखवून दिले आहे. तिच्या त्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही लाखात आहे. यावरुन तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. आपल्या अशा तऱ्हेवाईक फॅशनमुळे उर्फी ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र त्यामुळे तिला कोणताही फरक पडलेला नाही.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षानं आणि त्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यानं उर्फीशी पंगा घेतला होता. त्यानं तो चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. त्या दोघींच्या आरोप-प्रत्यारोपात उर्फीनं त्या महिला नेत्याची बोलतीच बंद केली होती. आता उर्फी पुन्हा एकदा तिच्या अजब व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तिनं विजयादशमीचे निमित्त साधून तो व्हिडिओ पोस्ट केला की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओवरुन तिला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

उर्फीच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीनं त्या व्हिडिओमध्ये जो गॉगल डोळ्याला लावला आहे त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात काहींनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या भलत्याच भन्नाट आहे. एकानं म्हटलं आहे की, उर्फी तुझा गॉगल पाहून रावणाची डोकेदुखी वाढली असती. दुसऱ्यानं म्हटलं आहे की, तुला काय म्हणावे हेच कळत नाही, अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी तुच करु शकतेस.

Urfi Javed tv actress funny video
Kangana Ranaut: 'हा तर शुभशकून..', तेजसच्या प्रमोशनवेळी कंगनाला फ्लाईटमध्ये झाली खास व्यक्तीची भेट

यापूर्वी देखील उर्फीनं वेगवेगळ्या व्हिडिओतून तिची क्रिएटिव्हिटी दाखवून दिली आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. मात्र अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावही केल्याचे दिसून आले आहे. उर्फीनं देखील आपल्याकडून अनेकदा सार्वजनिक नियमांचा भंग होत असल्याचे सांगत यापुढे त्याबाबत दक्षता घेण्यात येईल हे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यात तिला त्यावरुन कुणी बोलल्यास त्याचा तिनं चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले आहे.

आताच्या उर्फीच्या व्हिडिओनं मात्र नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि उर्फीचा वाद समोर आला होता. मात्र त्यानंतर ते दोघेही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते.

Urfi Javed tv actress funny video
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com