Urfi Javed Viral Video: सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात सुरू आहे. अनेक कलाकार देखील बाप्पाच्या चरणी लीन होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक गर्दी करत असतात यावेळी बॉलीवूडचे सेलिब्रेटी देखील मोठया प्रमाणात यावेळी दर्शनासाठी येत असतात. त्यातच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचली.
सध्या उर्फीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ड्रेसिंग सेन्ससाठी नेहमी लाईमलाईटमध्ये राहणारी उर्फी आज तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या भक्तीमुळे चर्चेत आली आहे. उर्फी जावेद मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी अनवाणी पोहोचली आहे.
यावेळी उर्फीने पीच कलरचा सूट परिधान केला होता. तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. ती बाप्पाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली. यापुर्वी तिने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि आता ती गणरायाचा आशीर्वाद घेताना दिसली.
उर्फी गणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. हातात पुजेचे ताट घेऊन तिने गणरायाची आरतीही केली. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ती नतमस्तक झाली. तिने 'गणपती बाप्पा मोरया' चा जागरही केला.
उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्फी जावेद गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी आहे. नेटकऱ्यांना तिचा हा खुप आवडला. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी तिच्या लूकचही भरभरुन कौतुक केले आहे.
ग्लॉसी मेकअप आणि हेअर बनमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. उर्फी जावेद सुधारली की काय असं देखील नेटकरी म्हणत आहे.
उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की 2', 'बेपनाह' आणि 'मेरी दुर्गा' सारख्या टीव्ही शोमध्ये त्याने साईड रोल केले. उर्फीला बिग बॉस ओटीटी सीझन 1 मधून प्रसिद्धी मिळाली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.