Ushna Shah: 'भारतीयांना कॉपी करण्यात आयुष्य गेलं' पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शाहला तिच्याच लोकांनी केलं ट्रोल

Ushna Shah Wedding
Ushna Shah WeddingEsakal

भारत आणि पाकिस्तान याचे सबंध हे काही कोणापासून लपलेल नाही. पाकिस्तानात काहीही झालं की त्यांची भारतीयांशी होतेच. तसं काहीस आताही झालं आहे. नुकतचं पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री उस्ना शाहने लग्नगाठ बांधली आहे.

Ushna Shah Wedding
Hania Amir: नाटू-नाटू' वर पाकिस्तानच्या अभिनेत्रीचं नाचो नाचो! जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल

तिने लग्नाचा व्हिडिओ शेअर करताच तिचा लाल रंगाचा लेहेंगा आणि ब्राइडल लूक हा विषेश चर्चेचा विषय बनला. तिच्याच देशातल्या लोकांना तिचा राग आला आणि त्यांनी तिला ट्रोल केलं. लोक म्हणाले की ती तिची संस्कृती विसरली आहे आणि ती भारतीय वधूप्रमाणं श्रृंगार केलायं.

पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शाहने गोल्फर हमजा अमीनशी लग्न केले. सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. उस्नाने तिच्या खास दिवशी लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. त्याच्या लग्नात त्याने खूप एन्जॉय केले आणि जोरदार नाचले. मात्र, काही लोक तिच्या लग्नातील पोशाख आणि नृत्यावर खूश नाहीत.

Ushna Shah Wedding
Akshay Kumar: 'कुणाची लागली नजर' अक्षय कुमार ठरला फ्लॉप चित्रपटांचा बादशाह...

हे पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, हा 'पाकिस्तानींची स्वतःची संस्कृती आणि धर्म आहे. भारतीय संस्कृती पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न थांबवा. आम्ही मुस्लिम आहोत आणि आमचा धर्म आम्हाला असे कपडे घालण्याची परवानगी देत ​​नाही. नकारात्मकता पसरवणे थांबवा.

आणखी एका युजरने लिहिले, 'पाकिस्तानी नववधूनं अशा भारतीय स्टाईलमध्ये का कपडे घालत आहेत? ही आमची संस्कृती नाही!!" अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला आल्या आणि तिला खुप ट्रोलही करण्यात आलं.

Ushna Shah Wedding
Nikita Ghag: अभिनेत्रीनं परत केला दादा साहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड..म्हणाली, 'हा तर'

उस्नानेही तिच्या लग्नाच्या पोशाखावर आणि नृत्यावर आक्षेप घेणाऱ्याना तिच्या इंस्टाग्राम स्टोरी टाकत चांगलच सुनावलं. तिने लिहिलं की, 'ज्यांना माझ्या ड्रेसची अडचण होत आहे त्यांच्यासाठी, तुम्हाला माझ्या लग्नासाठी आमंत्रित केले गेलं नाही, किंवा तुम्ही माझ्या लाल लेहेंग्यासाठी पैसेही दिलेले नाहीत. माझे दागिने, माझा ड्रेल पूर्णपणे पाकिस्तानी आहे. लग्नात दाखल झालेल्या अनिमंत्रित छायाचित्रकारांना सलाम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com