Valentine Week 2024 : बॉलीवूड सेलिब्रेटींचा पहिला 'व्हॅलेंटाईन वीक'! काय मिळणार मोठं 'गिफ्ट'?

सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईनचा फिव्हर आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे.
Valentine Week 2024 Bollywood celebrities
Valentine Week 2024 Bollywood celebrities esakal

Valentine Week 2024 Bollywood celebrities : सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईनचा फिव्हर आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे. त्यात बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी अनेक बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. त्यात आता व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्तानं त्या कपल्सविषयी चर्चांना उधाण आले आहे.

व्हॅलेंटाईन पूर्वी त्या पूर्ण वीकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असल्याचे दिसून येते. त्याच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूडमधील सेलिब्रेटीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचे दिसून आले आहे. अशातच आपण यावेळी पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन वीक साजरा करणाऱ्या सेलिब्रेटींविषयी अन् त्यांनी १४ तारखेच्या निमित्तानं वेगळं काय प्लॅनिंग केलं आहे हे जाणून घेणार आहोत.

परिणीति चोपड़ा-राघव चढ्ढा (Parineeti chopra raghav Chadha)

बॉलीवूडमधील हायप्रोफाईल लग्न म्हणून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणाऱ्या राघव यांनी लोकप्रिय अभिनेत्री परिणीती सोबत गेल्या वर्षी लग्न केले होते. यावेळी ही जोडी आपला पहिला व्हॅलेंटाईन वीक साजरा कऱणार आहे.

रणदीप हुड्डा-लिन लेशराम (Randeep Hooda And Lin Meishram)

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा आणि लिन मेशरान यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. त्यांनी पारंपरिक पद्धतीनं केलेलं लग्न अनेकांच्या चर्चेचा विषय होता. मैतेई समारंभात त्यांचं लग्न चर्चेत आलं होतं.गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी लग्न केले. त्यांनी देखील आठवड्यात खास प्लॅन केल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वरा भास्कर-फहाद अहमद (Swara Bhaskar And Fahad Aehmad)

आपल्या परखड व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करचं समाजवादी पार्टीच्या फहाद अहदमसोबतचं लग्न हा चर्चेचा विषय झाला होता. त्यावरुन तिला काही प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. स्वरानं कोर्ट मॅरेज केलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्वराच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं होतं. त्यामुळे या कपल्सकडे व्हॅलेंटाईन वीक सादर करण्यासाठी मोठे निमित्त आहे.

आयरा खान-नूपुर शिखरे (Ira Khan And Nupur Shikhare)

आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी या वर्षी तीन जानेवारी रोजी लग्न केले. या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगल्याचे दिसून आले. उदयपूरमध्ये त्याचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. तर मुंबईमध्ये त्याचे रिसेप्शनही झाले.

Valentine Week 2024 Bollywood celebrities
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

वरुण तेज-लावण्या त्रिपाठी (Varun Tej And Lavanya Tripathi)

साऊथचं प्रसिद्ध कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २०२३ रोजी त्यांनी लग्न केले. त्याला बॉलीवूडमधील आणि साऊथचे अनेक सेलिब्रेटी हजर होते. हे कपल्स या वर्षी त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com