varun Dhavan pointing out anil kapoor's age दोघांमध्ये थोडी 'तू-तू,मै-मै' झाली खरी....Neetu singh,Kiara Advani,Jug Jug Jiyo Promotion | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kapoor

''बुढ्ढा होगा तेरा बाप''...अनिल कपूर संतापले

अनिल कपूर(Anil Kapoor),वरुण धवन,कियारा अडवाणी,नीतू सिंग-कपूर(Neetu Singh-Kapoor) अशी तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा 'जुग जुग जियो' नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय. कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहता यानं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं. भारतात चंदिगढ आणि इतरत्र या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच नीतू सिंग यांनी याबद्दल आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर त्यांनी लिहिलं होतं,''जुग जुग जियो सिनेमाचं शुटिंग संपलं. खूप छान अनुभव. मला या सिनेमानं खूप चांगले मित्र दिले,ज्यावेळी गरज होती त्यावेळी माझा आत्मविश्वास वाढविला. हा सिनेमा माझ्यासाठी नेहमीच खास राहील."

हेही वाचा: अनुराग कश्यप भडकला आणि चिडून म्हणाला,'भो-भो'

हा सिनेमा संपला असला तरी या सिनेमातील हे चार कलाकार या-ना त्या कारणाने सिनेमाचं प्रमोशन करीत असतात. नुकतंच या चार कलाकारांनी एका व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सिनेमाविषयी गप्पा मारत थोडं हटके पद्दतीनं प्रमोशन केलं. स्वतः वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ह्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये वरुण धवन सर्वांची ओळख करून देत होता. तेव्हा अनिल कपूर यांची त्याने ज्यापद्दतीने ओळख करून दिली त्यावरून दोघांमध्ये थोडं 'तू-तू,मै-मै' झाली खरी, पण मजा-मस्तीमध्ये बरं का.

वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ नक्की पहा.

या व्हिडिओ कॉलमध्ये सर्वांची ओळख करुन देताना वरुण धवनने(Varun Dhavan) अनिल कपूर यांची ओळख करून देताना 'मोस्ट सीनियर' असा उल्लेख केला. तो म्हणाला,''आमच्या सर्वात सीनियर असलेल्या व्यक्तीला भेटा.'' तेव्हा त्याला मध्येच तोडत अनिल कपूर म्हणाले,''सीनियर होगा तेरा बाप.'' यावर एकच हशा पिकला. नीतू सिंग जोरात हसल्या,पण कियारा म्हणाली की,''अनिलजी तुम्ही या सिनेमात वरुणच्या वडीलांचीच भूमिका करीत आहात हे विसरलात वाटतं.'' आणि लगेच वरुणनेही 'री' ओढत म्हटलं,''अरे हो की. मग तुम्ही माझे वडीलच आहात सिनेमात मग असंच म्हणणार मी.''

त्यानंतर करण जोहरशी संवाद साधण्यासाठी त्याला संपर्क साधताना त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचं नाव निघालं. तर लगेच अनिल कपूर यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट सिनेमात आहेत ना असं म्हटलं. तेव्हा नीतू सिंग लगेच म्हणाल्या,''नाही,रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आहेत.'' या कलाकारांचं सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने झालेलं या स्ट्रॉंग बॉंडिगचा इफेक्ट सिनेमात कसा जुळून आलाय हे पाहण्यासाठी आता सारे उत्सुक आहेत.

loading image
go to top