Chalapathi Rao: हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chalapathi Rao

Chalapathi Rao: हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. तेलगू चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते चलपती राव यांचे शनिवारी रात्री निधन झाले आहे. चलपती राव यांनी वयाच्या 78 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चलपती राव यांना त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही बातमी समोर येताच कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

अभिनेते चलपती राव यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा मुलगा रवी बाबू हा देखील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. राव हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांनी अभिनय जगतापासून बरेच दिवस झाले ब्रेक घेतला होता.

हेही वाचा: Tunisha Sharma: पोस्टमार्टमसाठी तुनिषाचा मृतदेह जेजे रुग्णालयात, आज होणार अंत्यसंस्कार..

ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांच्या जाण्यामुळे कुटुंब, मित्र-परिवार, चाहते यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. चलपती राव गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते पडद्यापासून दूर होते. चलपती वाढत्या वयाबरोबर अभिनयापासून दूर होत गेले. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर तो चाहत्यांच्या मनावर राज्य करत असे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि अभिनेते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: Tunisha Sharma : तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा शीजान खान आहे तरी कोण?

टॅग्स :Actorsouth film industry