Vikcy Kaushal : 'कतरिना आणि माझ्यात एकाच गोष्टीमुळे होतं भांडण'

कॉफी विथ करणच्या कार्यक्रमातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे. करण जोहरच्या या मुलाखतीवजा शो ची सध्या सोशल (Social media viral news) मीडियावर मोठी चर्चा आहे.
Vikcy Kaushal news
Vikcy Kaushal news esakal

Koffee With Karan 7 : कॉफी विथ करणच्या कार्यक्रमातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे. करण जोहरच्या या मुलाखतीवजा शो ची सध्या सोशल (Social media viral news) मीडियावर मोठी चर्चा आहे. विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोन्ही सेलिब्रेटी करणच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्याच कार्यक्रमात त्यानं (vicky kaushal) सिद्धार्थला कियाराच्या रिलेशनशिपविषयी विचारले होते. त्यावर सिद्धार्थनं आम्ही प्रेमात आहोत आणि लवकर चाहत्यांना गुड न्युज देणार असल्याचे सांगितले होते. यासगळ्यात करणनं विकी कौशलला देखील बोलते केले आहे.

विकीनं करणच्या त्या कार्यक्रमामध्ये केलेला खुलासा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्यांच्या लग्नाला हजर होते. तसेच दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाला अटी आणि नियमांचीही चर्चा झाली होती. करणच्या कार्यक्रमात आलेल्या विकीची करणनं चांगलीच फिरकी घेतली आहे. त्याला विचारलेल्या अनेक प्रश्नांनी त्याची बोलती बंद केली आहे. असं म्हटलं जातं की, विकी आणि कतरिनाच्या रिलेशशिपची पहिली सुरुवात ही करणच्या शोमधूनच झाली होती. त्यानंत सोशल मीडियावर या दोन्ही सेलिब्रेटींविषयी बोलले जाऊ लागले.

करणनं त्याच्या नेहमीच्या अंदाजात विकीला एक प्रश्न विचारला तो असा की, अशी कोणती गोष्टी ज्यामुळे तुझ्यात आणि कतरिनामध्ये नेहमीच भांडणं होतात. त्यावर विकीनं पहिल्यांदा कतरिनाचे खूप कौतूक केले. ती पत्नी म्हणून कशी आहे याविषयी सांगितले, करणच्या त्या प्रश्नावर तो म्हणाला की. माझं आणि तिचं भांडण हे नेहमीच किस करण्यावरुन होतं. त्याच्या या उत्तरावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी करणनं 2018 मधील एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली त्यात कतरिनानं सांगितलं की, तिची जोडी ही विकी कौशलसोबत जास्त चांगली दिसेल. त्यानंतर विकीला कळलं होतं की. कतरिना त्याला ओळखते तर... कारण त्यापूर्वी ते एकमेकांना भेटले नव्हते की, ते ओळखत होते.

Vikcy Kaushal news
Boycott Tiger 3 : 'आता तुझी वेळ आली!' आमीरनंतर सलमानवर निशाणा
Vikcy Kaushal news
Laal Singh Chaddha: आमिरच्या 10 चूका! त्या टाळल्या असत्या तर...

आमच्या दोघांमध्ये क्लोसेट स्पेस (कपडे ठेवण्याच्या जागेवरुन) नेहमीच भांडणं होतं असतात. कतरिनाला खूप जागा हवी असते. त्यामुळे तिच्या अशा आग्रहामुळे मला मात्र जागा मिळत नाही. मग माझी चिडचिड होते. आमच्यात या कारणामुळे सगळ्यात जास्त वादावादी होत असल्याचे विकीनं करणच्या शो मध्ये सांगितले होते.

Vikcy Kaushal news
Boycott Bollywood Trend : अर्जुन कपूरची युजर्सनी काढली लायकी; तुझे चित्रपट...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com