Video; 'फ्लाईट मिस झाली पण किस तर मिळाला', मियाचा बॉयफ्रेंड खुश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video; 'फ्लाईट मिस झाली पण किस तर मिळाला', मियाचा बॉयफ्रेंड खुश
Video; 'फ्लाईट मिस झाली पण किस तर मिळाला', मियाचा बॉयफ्रेंड खुश

Video; 'फ्लाईट मिस झाली पण किस तर मिळाला', मियाचा बॉयफ्रेंड खुश

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - मिया खलिफा ही मोठी सेलिब्रेटी आहे. ती तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी ओळखली जाते. तिनं काही बी ग्रेड टाईप मुव्हिजमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही मोठी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर मिया खलिफानं आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ती ट्रोल झाली होती. तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. मिया खलिफानं शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देणं हे अनेकांसाठी खटकणारी बाब होती. मात्र अनेक परदेशी कलावंतांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर दिलेल्या प्रतिक्रियांनी भारतीय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

आता मिया चर्चेत आली आहे ते तिच्या किसिंग व्हिडिओमुळे. तिनं तिच्या बॉयफ्रेंडला किस केलं आहे. आणि तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओला मियाच्या चाहत्यांनी लाईक करुन त्याला वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत. काहींनी अखेर तुला मियाचा किस मिळाला...अशा प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अश्लील चित्रपटांमध्ये काम करणे ही मिया खलिफाची खरी ओळख आहे. तिनं तिच्या बॉयफ्रेंड जाए कार्टेजसोबत काही व्हिडिओ शेयर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मिया खलिफा ही गायक जाए कार्टेजला डेट करताना दिसली आहे. त्यांनी आपल्या रिलेशनशिपविषयी सोशल मीडियावर खुलासाही केला आहे.

मियानं त्याला किस करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना मियानं लिहिलं आहे की, आम्ही आज आनंदी आहोत, आम्ही फ्लाईट मिस केली....असं म्हणून तो व्हिडिओ शेयर केला आहे. यापूर्वी मियानं तिचा पूर्व पती रॉबर्ट सँडबर्गपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिनं लिहिलं होतं की, आम्ही हे लग्न यशस्वी होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. एक वर्षानंतर असं जाणवलं की, आम्हाला वेगळं होण्याशिवाय पर्याय नाही.s

हेही वाचा: कृषी कायदे रद्द : कंगना म्हणते,'आता हुकुमशाही हा एकमेव पर्याय'

loading image
go to top