Vidya Balan: आलिया, बिपाशानंतर विद्याला 'डोहाळे': गुड न्युजची तयारी? | Vidya Balan Bollywood Actress Good News gossip | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidya Balan Good News

Vidya Balan: आलिया, बिपाशानंतर विद्याला 'डोहाळे': गुड न्युजची तयारी?

Vidya Balan Video Viral: बॉलीवूडमध्ये सध्या गुड न्युजचा सीझन सुरु आहे असे म्हणायला हरकत नाही. गेल्या महिन्यात आलिया भट्ट, सोनम कपूर आणि बिपाशा बासुनं गोड बातमी दिल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचा वेगळ्या स्टाईलमधील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती देखील लवकरच गुड न्युज (Bollywood Actress) देणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. विद्यानं बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आदित्य रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. लग्न झाल्यापासून विद्याचे चाहते तिच्या गुड न्युजची वाट पाहत आहेत. त्यामुळे आता (Viral News) सोशल मीडियावर विद्याला नेटकऱ्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये विद्या अनोख्या ढंगामध्ये दिसते. तिचा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरैशीच्या बर्थ डे पार्टीतील तो व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यानं तिच्या कमरेमागे हात लावून फोटोसाठी पोझ दिली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आणि विद्याच्या चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, विद्या देखील लवकरच गु़ड न्युज देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट, बिपाशा बासु यांनी गुड न्युज दिल्यानं चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: Video : ती तारीख हाच दिवस ३१ जुलै , महंमद रफी यांचे निधन - रामायण मालिकेचा समारोप

विद्याचा तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला गुड न्युज आहे का असे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विद्याला त्यावर खुलासा करावा लागणार आहे. एकानं कमेंट करताना लिहिलं आहे की, तिचा टॉप सैल असल्यानं तिनं तो मागून ओढून धरला आहे. त्यामुळे ती प्रेग्नंट आहे असे वाटत नाही. बाकी काही असले तरी विद्याच्या त्या फोटोनं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Ranveer Singh: 'न्युड फोटोग्राफी' वरुन 14 वर्षे कोर्ट कचेरी करणाऱ्या मिलिंदचा पाठींबा

Web Title: Vidya Balan Bollywood Actress Good News Gossip Start Video Viral Huma Qureshi Birth Day Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top