'शकुंतला देवी'मधील विद्या बालनचा लूक पाहिला का?

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

या चित्रपटामध्ये विद्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका साकारणार आहे. ह्युमन कॉम्पुटरच्या भूमिकेत ती प्रेक्षकांना दिसणार आहे.​

मुंबई : 'मिशन मंगल' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर विद्या बालन तिच्य़ा आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. 'शकुंतला देवी' चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर आता या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्य़ाच पोस्टरमध्ये विद्या एका वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. बॉयकटमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

- ‘हिंदी’ ट्विटवरून अमित शहांचा कमल हसन यांनी घेतला समाचार

- सॅक्रेड गेम्सच्या 'या' अभिनेत्याचा ब्राझीलमध्ये बोलबाला!

या चित्रपटामध्ये विद्या गणिततज्ज्ञ शकुंतला देवी यांची भूमिका साकारणार आहे. ह्युमन कॉम्पुटरच्या भूमिकेत ती प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर आणि टिझर विद्याने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय. इतर मुलांनी कशापद्धतीने पाढ्यांसह त्यांच्या गणिताच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि दुसरीकडे शकुंतला देवीने कठीण गणितांसह सुरुवात केली, हे टिझरमध्ये दाखवण्यात आलंय. टिझर शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, "ती सर्वच शब्दांमध्ये असाधारण होती. याच विलक्षण मुलीची आणि ह्युमन कॉम्पुटरची कहाणी जाणून घ्या ". 

- 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला गंभीर आजार; सोशल मिडियावर पोस्ट टाकून दिली माहिती

शकुंतला देवी यांना सर्वत्र ह्युमन कॉम्पुटर किंवा मेंटल कॅल्क्युलेटर म्हणून ओळखतात. अवघ्या पाच वर्षाच्या वयामध्ये त्या 18 वर्षांच्या मुलांची गणिते सोडवत असत. विद्या या बायोपिकमधून शकुंतला देवींच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे. विद्याने लंडनमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे.

- आयुषमानला वाढदिवसाचं चाहत्यांकडून 'हे' मोठं गिफ्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Balans First Look in upcoming movie Shakuntala Devi