विजय देवरकोंडासाठी चाहत्यांची गर्दी, साऊथचा स्टार मराठीत म्हणाला...

आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.
Vijay Deverakonda
Vijay Deverakonda esakal

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हे आपल्या लायगर (Liger) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. सदरील व्हिडिओ हा नवी मुंबईतील एका कार्यक्रमाचा आहे. विजय आणि अनन्या हे दोघे नवी मुंबई येथील एका माॅलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. (Vijay Deverkonda Reach Mumbai With Ananya Panday For Promotion Of Liger Movie)

Vijay Deverakonda
लोक मला हिणवायचे, म्हणायचे की तुझ्याकडे रंग नाही - हेमांगी कवी

जमलेल्या चाहत्यांना शांत होण्याचे आवाहन करताना विजय व्हिडिओत दिसतो. विजय देवरकोंडा ((Vijay Deverakonda)) हा लायगर या चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये (Bollywood News) पर्दापण करत आहे. लायगर हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Vijay Deverakonda
श्रेया बुगडेचे फोटो पाहून स्वप्निल जोशी म्हणाला, मी तुला ब्लाॅक करतो !

व्हिडिओत विजय मराठीत बोलताना दिसत आहे. तो म्हणतो नमस्कार मुंबई ! कसे आहात तुम्ही लोक असं प्रश्न ते माॅलमध्ये उपस्थित मराठी लोकांना करतो. चाहत्यांचा प्रतिसाद पाहून त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com