लाइगर फ्लाॅप! कलाकारांसह वितरकांचे नुकसान, भरपाईसाठी हा निर्णय घेतला गेला

लाइगर फ्लाॅप! कलाकारांसह वितरकांचे नुकसान
Vijay Deverakonda And Ananya Pandey
Vijay Deverakonda And Ananya Pandey esakal

Vijay Deverakonda Liger Movie Flops : विजय देवरकोंडा-अनन्या पांडे यांचा 'लाइगर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला आहे. १२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आठ दिवसांत ४० कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), अनन्या पांडे (Ananya Panday) यांची प्रतिमा आणि निर्मात्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

अलीकडेच एका मीडिया संवादादरम्यान, पुरी जगन्नाथच्या चित्रपटाचे वितरक वारंगल श्रीनू म्हणाले होते की, लाइगरमुळे माझी सुमारे ६५ टक्के गुंतवणूक कमी झाली आहे.

Vijay Deverakonda And Ananya Pandey
Sonali Bendre : सोनालीच्या साधेपणाने चाहत्यांचे हृदय जिंकले

वितरक काय म्हणाले?

गेल्या १२ महिन्यांत १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या वृत्ताचे खंडन करताना, वारंगल श्रीनू म्हणाले, नाही, मी एका वर्षात १०० कोटी रुपये गमावले नाही. मीडिया हाऊसशी संवाद साधताना. पण मी खूप सारा पैसा गमावला आहे. यात काही शंका नाही. लाइगरमुळे माझी जवळपास ६५ टक्के गुंतवणूक कमी झाली आहे. (Bollywood News)

पुरी जगन्नाथाचा मोठा निर्णय

लाइगरच्या वितरकांची अशी अवस्था पाहून पुरी जगन्नाथ भावूक झाले आहेत. वितरक वारंगल श्रीनूच्या म्हणण्यानुसार, लाइगरचे दिग्दर्शक-निर्माते पुरी जगन्नाथ हे वितरकांना भेटण्यासाठी हैदराबादला जाण्याची योजना आखत आहेत. इतकेच नाही तर पुरी जगन्नाथ हे वितरकांशी बोलून नुकसानीबद्दल बोलून त्यांना भरपाई देण्याचा विचार करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com