विकीला आहे समुद्राची भिती vicky recalls his childhood home | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकी कौशल

विकी कौशलला आली बालपणीच्या दहा बाय दहाच्या खोलीची आठवण!

sakal_logo
By
प्रणाली मोरे

मसान,उरी,सरदार उधम,मनमर्झियाॅं,गॅंग्ज ऑफ वासेपूर असे एकापेक्षा एक सिनेमे देणा-या विकी कौशलचं नाव आज बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये नक्कीच घ्यावं लागेल. आज तो मुंबईत मोठ्या प्रशस्त घरात राहत असला किंवा बड्या गाड्यांमधून फिरत असला तरी त्याचं बालपण मात्र दहा बाय दहाच्या खोलीत गेल्याची सुंदर आठवण त्याने 'द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स' या डिस्कवरी प्लस वाहिनीवरील कार्यक्रमात शेअर केली. हा कार्यक्रम लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात एक अॅक्टिव्हिटी करताना एका झोपडीवजा छोटाशा खोलीत प्रवेश केल्यानंतर विकीला आपल्या बालपणीच्या घराची आठवण झाली. तो म्हणाला,"माझं बालपणीचं घर या खोलीपेक्षा थोडंसं मोठं होतं. तसंच,त्या घराला स्वतंत्र किचन आणि बाथरूम नव्हतं. एकच खोली ज्यात आमचं पूर्ण कुटूंब राहत होतो. ते लहान घर ते आजचं प्रशस्त घर असा प्रवास करताना आम्ही अनेक खडतर परिस्थितीचा सामना एकत्रितपणे केलाय. खरंतर या प्रवासानेच मला माणूस म्हणून स्ट्राॅंग बनवलंय असं मी म्हणेन. या दहा बाय दहाच्या खोलीतनंच माझ्या यशाचा प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरणार नाही.

हेही वाचा: वाळवंट, त्यात जान्हवीचा हॉट अंदाज.. एक्स बॉयफ्रेंडची कमेंट वाचाच!

ह्याच कार्यक्रमात विकीला खोल समुद्रात मध्यावर नेण्यात आले तेव्हा तो म्हणाला ,"मला खोल समुद्राची भिती वाटते. मी माझ्या आयुष्यात उथळ किंवा खोल समुद्राच्या पाण्याचा अनुभव कधीच घेतला नाही. या कार्यक्रमामुळे माझी खोल समुद्राची भीती दूर होवो ही मी अपेक्षा करतो".

सध्या विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या बातम्यांना ऊधाण आलंय. त्याच्या लग्नाच्या बातमीत किती तथ्य आहे यासंदर्भात त्याला विचारलं असता तो म्हणाला,'काय बोलणार यावर. सकाळी एखादी लग्नाची बातमी आली की रात्रीपर्यंत मीडियाच त्या बातमीचं स्पष्टीकरण देते की लग्नाची बातमी खरी नाही. त्यामुळे मला बोलायचं असं काही राहतंच नाही'.

हेही वाचा: 'ट्विंकल बंद कर तुझं गाणं, ते ऐकल्यावर अक्षयला'...

विकी कौशलचा सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित सरदार उधम हा सिनेमा नुकताच येऊन गेला. तो यानंतर मेघना गुलझारच्या सैम बहादुर सिनेमात दिसणार आहे. भारतीय सेनेचे पहिले फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

loading image
go to top