"माझ्यावर RSS चे संस्कार, मी अंधभक्त नाही, गोखलेंवर बोलणार नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Soman
विक्रम गोखलेंवर बोलणार नाही, मी अंधभक्त नाही - योगेश सोमण

विक्रम गोखलेंवर बोलणार नाही, मी अंधभक्त नाही - योगेश सोमण

पुणे: परखडपणे आणि स्पष्टपणे बोलता आले पाहिजे. आपला विचार आग्रहाने मांडता आला पाहिजे. आज मी इथे विक्रम गोखलेंवर बोलणार नाही, असे म्हणत रंगकर्मी आणि अभिनेते योगेश सोमण यांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले.

हेही वाचा: कंगना रनौतवर गुन्हा दाखल; शीख समुदायाचा अपमान करणं महागात पडणार

टिळक रस्ता येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित 'फुलोरा' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या साहित्य आघाडीच्या वतीने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, जिल्ह्या कार्याध्यक्ष मंदार रेडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयीन जीवनात कलेची उपासना करणारे नंतर व्यवहारिक जंजाळात अडकल्यानंतर व्यक्त होत नाही, अशी खंत सोमण यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,"काव्यसंग्रहात सर्वाधिक कविता कवियत्री च्या आहेत. मात्र प्रत्यक्ष साहित्य विश्वात त्यांची संख्या कमीच आहे. मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या फार थोड्या कवयित्री आहे. त्यांनी ही कला जोपासावी आणि या पदापर्यंत पोहचावे." ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते या मराठी साहित्यातील मोठ्या देणग्या आहेत, असेही सोमण म्हणाले.

Yogesh Soman

Yogesh Soman

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

मी अंधभक्त नाही...

माझ्या पाठीमागे जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे. मी अंधभक्त नाही, रॅशनल विचार करतो. तो मांडतोही. एखाद्या गोष्टींमागची कारणमीमांसा करता आली पाहिजे, असे सोमण म्हणाले

loading image
go to top