Vikram Gokhale: 'आज पुन्हा जवळचा माणूस गमावला...', विक्रम गोखलेंच्या आठवणीत अजिंक्य देव भावूक

२६ नोव्हेंबर,२०२२ रोजी विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले.
Vikram Gokhale Death, Ajinkya Deo share memory of Vikram Gokhale
Vikram Gokhale Death, Ajinkya Deo share memory of Vikram GokhaleInstagram

Vikram Gokhale: आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Vikram Gokhale Death, Ajinkya Deo share memory of Vikram Gokhale)

Vikram Gokhale Death, Ajinkya Deo share memory of Vikram Gokhale
Vikram Gokhale:'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त..',अनुपम खेरनी शेअर केलेला विक्रम गोखलेंचा Unseen Video चर्चेत

अजिंक्य देव यांनी विक्रम गोखले यांच्या काही आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजिंक्य देव म्हणाले, ''विक्रम गोखले यांच्या बरोबर मी तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'माहेरची साडी', 'लपंडाव' आणि 'थोडं तुझं आणि थोडं माझं'. पण माहेरची साडीमध्ये केलेलं काम आजही माझ्या आठवणीत आहे‌.या चित्रपटात विक्रम गोखले यांनी माझ्या पित्याची भूमिका साकारली होती पण शुटिंग दरम्यान ते नेहमी मला आणि अलका कुबलला मार्गदर्शन करत असत. फक्त मीच नाही तर माझ्या आई वडिलांनी त्यांच्या वडिलांबरोबर काम केलं आहे त्यामुळे आमच्यात एक कौटुंबिक गोडवा होता''.

Vikram Gokhale Death, Ajinkya Deo share memory of Vikram Gokhale
Vikram Gokhale Funeral: विक्रम गोखले अनंताच्या प्रवासाला, चाहत्यांना अश्रू अनावर...

''ते एक गुणी कलावंत होते, सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस, लहान मोठ्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देणे, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणे. एखादा कलाकार अडखळत असेल तर त्यांनी कायमच त्याला मदत केली आहे. एका छान कलाकाराला आपण मुकलेलो आहोत. अजुनपण विश्वास बसत नाही आहे की ते इतक्या लवकर आपल्याला सोडून गेले आहेत.''.

''आपल कोण जवळचं जात तेव्हा कसे वाटते ती परिस्थिती मी बाबा गेले तेव्हा अनुभवली. मात्र आता परत तीच वेळ आली आहे खूप त्रास होतो आहे''.अशा भावूक शब्दांत अजिंक्य देव यांनी विक्रम गोखले यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com