'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त..', अनुपम खेरनी शेअर केलेला विक्रम गोखलेंचा Unseen Video चर्चेत Vikram Gokhale Health Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher Share actor Vikram Gokhale unseen video,reciting a poem

Vikram Gokhale:'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त..',अनुपम खेरनी शेअर केलेला विक्रम गोखलेंचा Unseen Video चर्चेत

Vikram Gokhale: बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयामुळे ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज २६ नोव्हेंबर,२०२२ रोजी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारामुळे निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. विक्रम गोखले यांच्यासाठी त्यांचा चाहतावर्ग मनापासून प्रार्थना करत होता पण अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. (Anupam Kher Share actor Vikram Gokhale unseen video,reciting a poem)

हेही वाचा: Samantha: 'समंथा हॉस्पिटलमध्ये दाखल झालीच नाही,ती तर... ', आजारी अभिनेत्रीच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

या दरम्यान आता विक्रम गोखले यांचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. जो विक्रम गोखले यांनी स्वतः रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन आठवड्यापूर्वी अनुपम खेर यांना पाठवला होता. या व्हिडीओ विषयी विक्रम गोखले यांनी स्वतः सर्वांना आवाहन केलं होतं की जी कविता या व्हिडीओत ते ऐकवत आहेत ती सर्वांनी लक्ष देऊन ऐकावी. कारण हा तो योग्य काळ आहे ज्यात ही कविता खूप महत्त्वाची शिकवण देऊन जाते.

हा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिलं आहे की जी कविता विक्रम गोखले व्हिडीओतून ऐकवत आहेत, ती अपूर्ण आहे. जेव्हा त्यांनी हेच सांगायला विक्रम गोखले यांना विचारायला फोन केला होता,तेव्हा ते म्हणाले होते,'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त...'. अनुपम खेर आणि विक्रम गोखले खूप खास मित्र आहेत. तसंच,अनुपम खेर आणि विक्रम गोखले यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत विक्रम गोखले सगळ्यांनाच ती कविता लक्षपूर्वक ऐकायला सांगत आहेत. आणि त्या कवितेवर विचार करा असं देखील म्हणताना दिसत आहेत. कविता काहीशी अशी आहे-''ना मैं किन्नर हूं। ना मैं यक्ष, ना मैं रक्ष। ना मैं वानर, ना मैं मल्ल, ना मैं निषाद, ना मैं रीछ, ना मैं दानव, ना मैं अहीर, ना मैं जाट, ना मैं गुर्जर, ना मैं अंजना, ना मैं पटेल, ना मैं पाटिल, ना मैं पाटीदार...''

२३ नोव्हेंबरला एक बातमी वाऱ्यासारखी पसरली जिनं सर्वांनाच धक्का बसला होता ती म्हणजे विक्रम गोखेले यांच्या निधनाची. ज्यानंतर अजय देवगणपासून अनुपम खेर,मधुर भांडारकर,जावेद जाफरी अशा सर्वांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. पण त्यानंतर विक्रम गोखले यांची पत्नी वृषाली गोखले यांनी या सर्व अफवा आहेत,विक्रमजी कोमात आहेत आणि औषधोपचारांना साथ देत नाहीयत असं स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच आज अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र,आपल्या कामाच्या माध्यमातून ते कायम त्यांंच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतील हे देखील तितकंच खरं आहे.